भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे 441 धावांचे लक्ष्य

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

गहुंजे : भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात सर्वबाद 285 धावा करत भारतासमोर 441 धावांचे विशाल लक्ष्य ठेवले आहे.

ऑस्ट्रेलियाच्यावतीने आज स्टिव्हन स्मिथने 202 चेंडूत 11 चौकारांच्या सहाय्याने १०९ धावा केल्या. मात्र, त्याशिवाय कोणालाही पन्नाशीही गाठता आली नाही. तर भारताच्यावतीने रवीचंद्रन आश्‍विनने 4 बळी, तर रवींद्र जडेजाने तीन आणि उमेश यादवने एक बळी मिळविला.

पहिल्याच कसोटी सामन्यात पहिल्या दिवसापासूनच ऑस्ट्रेलियाचे पारडे जड असल्याचे दिसून आले. पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी स्वीकारली.  परदेशात हिरव्यागार खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांसमोर शरणागती पत्करणाऱ्या भारतीय फलंदाजांची मायदेशात फिरकीस अनुकूल वातावरणात ऑस्ट्रेलियाच्या स्टीव ओकीफनामक नवख्या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजामुळे घसरगुंडी उडाली. जगातील पहिल्या दोन क्रमांकांच्या संघांमधील या महामुकाबल्यात महाशिवरात्रीच्या दिवशी महाघसरगुंडीमुळे यजमान संघ चार कसोटींच्या मालिकेत बॅकफूटवर गेला आहे. दुसऱ्या दिवशी एकूण 15 विकेट पडल्या. पहिल्या दिवशी फलंदाजीत प्रतिआक्रमण रचलेल्या कांगारूंनी गोलंदाजीत त्याहून मोठा धक्का दिला तो चपळ क्षेत्ररक्षणाच्या जोरावर. ओकीफने सहा विकेट घेत वर्मी घाव घातला. शुक्रवारी पहिल्या डावात भारताला 105 धावांत गुंडाळला

स्मिथला तीन जीवदाने
स्मिथवर भारतीयांनी तीन जीवदानांची मेहेरनजर केली. 23 धावांवर अश्‍विनच्या चेंडूवर लेग-स्लीपमध्ये विजयने झेल सोडला. मग राहुलऐवजी बदली क्षेत्ररक्षक अभिनव मुकुंदने स्मिथला वैयक्तिक 29 आणि 37 धावांवर अनुक्रमे जडेजा, अश्‍विनच्या गोलंदाजीवर जीवदान दिले. त्यामुळे आज स्मिथ शतकी खेळी करू शकला.

Web Title: Ind v/s Australia : India wants 441 runs to win