भारत वि. इंग्लंड कसोटी: दुसऱ्या दिवशीही अश्‍विनला यश!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

मुंबई : वानखेडे स्टेडिअमवर सुरु असलेल्या इंग्लंविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवशी इंग्लंडने वर्चस्व दाखविण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे मोठी धावसंख्या उभारली जाईल, अशी शक्‍यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र अश्‍विनने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन तीन चेंडूत दोन बळी मिळविले आणि भारताच्या आशा उंचावल्या. दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाल्यानंतरही अश्‍विननेच भारताला दुसऱ्या दिवसातील पहिले यश प्राप्त करून दिले आहे.

दुसऱ्या दिवशी मैदानावर स्थिरावलेल्या स्ट्रोक्‍सला अश्‍विनने बाद करून भारतीय संघाचा आत्मविश्‍वास उंचावला आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा इंग्लंडने सहा बाद 311 धावा केल्या आहेत. भारतीय संघासाठी पहिला दिवस फारसा लाभदायक ठरला नाही. नाणेफेक जिंकत इंग्लंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. समाधानकारक बाब म्हणजे अश्‍विनने एकाच षटकात मोईन अली व जेनिंग्स यांना बाद केल्यामुळे इंग्लंडच्या धावगतीला ब्रेक लावता आला. तसे झाले नसते तर इंग्लंडने पहिल्याच दिवशी 300 धावांचा टप्पा ओलांडून मोठी धावसंख्या उभारली असती. आजही अश्‍विननेच 92 चेंडूत 31 धावा करणाऱ्या स्ट्रोक्‍सला परत तंबूत पाठविले. त्यामुळे भारतीय संघात आत्मविश्‍वास संचारला आहे.

Web Title: Ind vs England: Second Day Score