IndvsNZ : दुसरा सामना जिंकत के एल राहुलचे अनोखे दोन विक्रम

वृत्तसेवा
Sunday, 26 January 2020

ऑकलंड : लोकेश राहुल सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. न्यूझीलंड दौऱ्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यात के एल राहुलने नाबाद अर्धशतकी खेळी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. लोकश राहूलने अर्धशतकी खेळी करत आज अनोख्या दोन विक्रमांना गवसणी घातली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लोकेश राहुलने ५० चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने नाबाद ५७ धावा केल्या. न्यूझीलंडमध्ये आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकं झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत राहुल आता पहिल्या स्थानी आहे.

प्रजासत्ताकदिनीच आसाममध्ये चार बाम्बस्फोट

यासोबत राहुलने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सलग ३ अर्धशतकं झळकावणाऱ्यांच्या यादीतही आपलं स्थान पक्क केलं आहे. या यादीत यापूर्वी रोहित शर्मा आणि विराट कोहली हे होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ind vs nz 2nd t20i lokesh rahul shines with his not out half century creates multipal record