World Cup 2019 : भारत पहिल्यांदा करणार बॅटिंग; कोणतेही बदल नाहीत

वृत्तसंस्था
Thursday, 27 June 2019

क्रिकेटविश्वातील सर्वाधिक बेभरवशीचा संघ असलेल्या वेस्च इंडिजशी भारतीय संघ आज भिडणार आहे. आजच्या सामन्यात भुवनेश्वर कुमार संघात आल्यावर कोणाला संघातून वगळणार यावर बरीच चर्चा केली जात होती. मात्र, भुवीला एवढ्यात खेळविण्याचा धोका घेण्यात आलेला नाही. 

वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : क्रिकेटविश्वातील सर्वाधिक बेभरवशीचा संघ असलेल्या वेस्च इंडिजशी भारतीय संघ आज भिडणार आहे. आजच्या सामन्यात भुवनेश्वर कुमार संघात आल्यावर कोणाला संघातून वगळणार यावर बरीच चर्चा केली जात होती. मात्र, भुवीला एवढ्यात खेळविण्याचा धोका घेण्यात आलेला नाही. 

मैदानावर लख्ख सूर्यप्रकाश पडला अल्याने पावसाची काहीही चिंता नाही. अशावेळी भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 

विंडीजने ओश्ने थॉमस आणि एव्हिन लुईस यांना अंतिम संघातून वगळले आहे. आंद्रे रसेलच्याऐवजी संघात स्थान मिळालेल्या सुनील अंब्रिसलाही अंतिम संघात जागा देणयात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IND vs WI Kohli wins toss, India to bat in Manchester