कसोटी क्रमवारीत भारत, अश्‍विन दुसऱ्या स्थानी

वृत्तसंस्था
बुधवार, 13 जुलै 2016

दुबई - कसोटी क्रमवारीत भारत दुसऱ्या स्थानावर असून, फिरकी गोलंदाज अश्‍विन दुसऱ्या आणि अष्टपैलू यादीत अव्वल स्थानावर आहे. आयसीसीने मंगळवारी नवी कसोटी क्रमवारी जाहीर केली. 

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात चार कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेत पाकिस्तानने २-१ किंवा ३-१ असा विजय मिळविल्यास त्यांना दुसऱ्या स्थानावर येण्याची संधी मिळेल. दुसऱ्या क्रमांकासाठी कमालीची स्पर्धा असून, भारत, पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात खूपच कमी गुणांचा फरक आहे. 

पाकिस्तानने ही ३-० किंवा ४-० अशी जिंकल्यास त्यांना थेट अव्वल क्रमांकावर येण्याची संधी आहे. अव्वल स्थानावर सध्या ऑस्ट्रेलिया आहे. इंग्लंडने श्रीलंकेवरील विजयानंतर मुसंडी मारली असली, तरी त्यांच्यात आणि पाकिस्तान यांच्यात केवळ तीन गुणांचा फरक आहे. त्यामुळे इंग्लंडलादेखील दुसऱ्या क्रमांकाची संधी असल्याचे चित्र आहे. पण, त्यांना मालिका ३-० अशी जिंकावी लागेल. 

फलंदाजीत इंग्लंड चौथ्या स्थानावर आहे. ॲलिस्टर कूक, जॉनी बेअरस्टॉ हे दोनच फलंदाज पहिल्या विसांत आहेत. तुलनेत पाकिस्तानचे पाच फलंदाज पहिल्या विसांत आहेत. आघाडीवर स्टिव्ह स्मिथ असून, पाठोपाठ न्यूझीलंडचा केन विल्यम्सन आणि दक्षिण आफ्रिकेचा हशिम आमला यांचा क्रमांक येतो. 
गोलंदाजीत इंग्लंडचा जेम्स अँडरसन आघाडीवर आहे. मात्र, खांद्याच्या दुखापतीमुळे त्याच्या क्रमवारीवर गदा येऊ शकते. दुसऱ्या क्रमांकावर भारताचा आर. अश्‍विन असून, दोघांच्यात केवळ सहा गुणांचा फरक आहे. स्टुअर्ट ब्रॉड तिसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज यासिर शाह चौथ्या स्थानावर असला, तरी त्याला या मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरी करून अव्वल स्थानावर येण्याची खूप संधी आहे. याच मालिकेत त्याला कारकिर्दीत बळींचे शतकही गाठण्याची संधी असेल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India and R Ashwin ranked second in latest ICC Rankings