भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान क्रीडाविकास करार

यूएनआय
गुरुवार, 13 एप्रिल 2017

नवी दिल्ली - क्रीडाविकास आणि क्रीडा सहभाग वाढवण्याच्या दृष्टिकोनातून भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान क्रीडा करारावर सह्या करण्यात आल्या.

नवी दिल्ली - क्रीडाविकास आणि क्रीडा सहभाग वाढवण्याच्या दृष्टिकोनातून भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान क्रीडा करारावर सह्या करण्यात आल्या.

माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या उपस्थितीत मुंबईत बुधवारी या करारावर केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम यांनी सह्या केल्या. या करारादरम्यान खेळाडू आणि प्रशिक्षक प्रशिक्षण; तसेच क्रीडाविकास, क्रीडाशास्त्र, क्रीडा नियमन आणि एकात्मिता, क्रीडा सहभाग या चार गोष्टींवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे.
क्रीडामंत्री गोयल म्हणाले, ""क्रीडाक्षेत्राचा विचार करता आम्हाला ऑस्ट्रेलियाकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. या करारामुळे भारतीय क्रीडाक्षेत्राला फायदाच होईल. निरोगी जीवन आणि शिक्षण या दोन्ही आघाड्यांवर आम्ही आता खेळाला विशेष महत्त्व देण्याचा निर्णय घेतला आहे. शाळांमधून क्रीडा विषय अनिवार्य करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.'

Web Title: india-austrolia sports development agreement