क्रिकेट: भारताची फलंदाजी; उमेशला वगळले 

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 जानेवारी 2017

कटक : भारताविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील पराभव टाळण्यासाठीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली. तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड 0-1 अशा पिछाडीवर आहे. भारतीय संघात एक बदल करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या जागी भुवनेश्‍वर कुमारला संधी मिळाली आहे. 

पुण्यात झालेल्या पहिल्या सामन्यात कर्णधार विराट कोहली आणि केदार जाधव यांच्या दमदार फलंदाजीमुळे भारताने 351 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. कसोटी मालिकेमध्ये सपाटून मार खाल्लेल्या इंग्लंडला या दौऱ्यातील पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे. एकदिवसीय संघातील ताज्या दमाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई करत 350 धावांचा डोंगर उभा केला होता. पण कोहली-जाधव जोडीने इंग्लंडला धक्का दिला होता. 

या सामन्यासाठी भारतीय संघातून उमेश यादवला वगळण्यात आले. त्यामुळे तब्बल एका वर्षानंतर भुवनेश्‍वर कुमारचे एकदिवसीय संघात पुनरागमन झाले आहे. या सामन्यात इंग्लंडने आदिल रशीदला वगळून वेगवान गोलंदाज लियाम प्लंकेटला स्थान दिले. फिरकी गोलंदाजांवरील भारतीय फलंदाजांचे वर्चस्व पाहता इंग्लंडने आज पाच वेगवान गोलंदाजांना संधी दिली आहे. 

भारतीय संघ : 
शिखर धवन, के. एल. राहुल, विराट कोहली (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी (यष्टिरक्षक), युवराजसिंग, केदार जाधव, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर. आश्‍विन, भुवनेश्‍वर कुमार, जसप्रित बुमराह. 

इंग्लंडचा संघ : 
जेसन रॉय, ऍलेक्‍स हेल्स, ज्यो रूट, जोस बटलर (यष्टिरक्षक), इऑन मॉर्गन (कर्णधार), बेन स्टोक्‍स, मोईन अली, ख्रिस वोक्‍स, डेव्हिड विली, लियाम प्लंकेट, जेक बॉल. 

Web Title: India bat first in second ODI against India