पाकचा धुव्वा उडवून भारत अंतिम फेरीत

वृत्तसंस्था
Saturday, 9 June 2018

भारतीय गोलंदाजांसमोर पाकिस्तानचा संघ अवघ्या 72 धावाच बनवू शकला. भारताने पाकिस्तानचे हे आव्हान 17 व्या षटकात 3 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करत विजय मिळविला. आशिया करंडकात आतापर्यंत भारताने खेळलेल्या पाच सामन्यांतील हा चौथा विजय होता. भारतीय संघ आठ गुणांसह अंकतालिकेत पहिल्या स्थानावर आहे.

क्वाललंपूर : भारतीय महिला क्रिकेट संघाने आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानचा धुव्वा उडवून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

भारतीय गोलंदाजांसमोर पाकिस्तानचा संघ अवघ्या 72 धावाच बनवू शकला. भारताने पाकिस्तानचे हे आव्हान 17 व्या षटकात 3 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करत विजय मिळविला. आशिया करंडकात आतापर्यंत भारताने खेळलेल्या पाच सामन्यांतील हा चौथा विजय होता. भारतीय संघ आठ गुणांसह अंकतालिकेत पहिल्या स्थानावर आहे.

भारताने प्रथम गोलंदाजी करताना पाकिस्तानचा डाव 72 धावांत संपुष्टात आणला. पाकिस्तानच्या फक्त दोनच खेळाडू दुहेरी धावसंख्या गाठू शकल्या. भारताची डावखुरी फिरकी गोलंदाज एकता बिष्टने 14 धावांत 3 बळी मिळविले. एकतालाच सामन्याचा मानकरी म्हणून घोषित केले. भारताने पाकिस्तानचे हे आव्हान सहज पार केले. सलामीवीर स्मृती मनधना (38 धावा) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर (नाबाद 34) यांनी 65 धावांची भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India beat Pakistan by 7 wickets to reach Womens Asia Cup final