esakal | पाकचा धुव्वा उडवून भारत अंतिम फेरीत
sakal

बोलून बातमी शोधा

India Beat Pakistan By 7 Wickets To Reach Womens Asia Cup Final

संक्षिप्त धावफलक ः 
पाकिस्तान 7 बाद 72 (मीर नाबाद 20, नाहिदा 18, बिश्‍त 3-14, पूनम पाण्ड्ये 1-6) पराभूत वि. भारत 3 बाद 75 (स्मृती मानधना 38, हरमनप्रीत कौर नाबाद 34, अमिना 2-10) 

पाकचा धुव्वा उडवून भारत अंतिम फेरीत

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

क्वालालंम्पूर (मलेशिया) - बांगलादेश विरुद्धचा पराभव वगळता निर्विवाद वर्चस्व राखणाऱ्या भारतीय महिलांनी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा सात विकेट राखून सहज पराभव करत महिलांच्या आशियाई टी 20 क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी प्रथम फलंदाजी करताना भारतीयांच्या अचूक गोलंदाजीपुढे पाकिस्तानला 7 विकेट गमावून केवळ 72 धावांचीच मजल मारता आली. भारताकडून डावखुरी फिरकी गोलंदाज एकता बिश्‍त हिने 14 धावांत 3 गडी बाद केले. 

भारतीय महिलांनी 23 चेंडू राखून आव्हान पार केले. सलामीची फलंदाज स्मृती मानधना हिने 38, तर कर्णधार हरमनप्रीतने 34 धावांचे योगदान दिले. मिताली राज आणि दीप्ती शर्मा यांना खातेही उघडता आले नाही. त्यानंतर मानधना आणि हरमनप्रीत यांनी 65 धावांची भागीदारी केली. 

संक्षिप्त धावफलक ः 
पाकिस्तान 7 बाद 72 (मीर नाबाद 20, नाहिदा 18, बिश्‍त 3-14, पूनम पाण्ड्ये 1-6) पराभूत वि. भारत 3 बाद 75 (स्मृती मानधना 38, हरमनप्रीत कौर नाबाद 34, अमिना 2-10) 

 

loading image