पाकचा पराभव करून भारताने जिंकला 'वर्ल्डकप'

वृत्तसंस्था
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

टी-20 क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे कटट्‍र प्रतिस्पर्धी आमनेसामने आले होते. त्यामुळे सर्वांचे लक्ष या लढतीकडे होते. अखेर भारताने यामध्ये यश मिळविले.

बंगळूर - अंधांच्या ट्वेंटी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेत भारताने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा नऊ गडी राखून पराभव करत विश्वकरंडक जिंकला. 

एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आज (रविवार) झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी 198 धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने हे आव्हान अवघ्या एक गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले. भारताकडून बदर मुनीरने 57 धावांची खेळी केली. 

टी-20 क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे कटट्‍र प्रतिस्पर्धी आमनेसामने आले होते. त्यामुळे सर्वांचे लक्ष या लढतीकडे होते. अखेर भारताने यामध्ये यश मिळविले. भारताने 2013 मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते. विजेतेपद कायम राखण्यात भारताला यश आले आहे. भारताने उपांत्य फेरीत गतविजेत्या श्रीलंकेला दहा विकेट राखून पराभूत केले होते.

Web Title: India Beat Pakistan By 9 Wickets To Win T20 World Cup For Blind