भारताचा झिंबाब्वेवर दहा गडी राखून विजय

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 जून 2016

हरारे : बरिंदर स्रान आणि जसप्रित बुमराह यांच्या भेदक गोलंदाजीनंतर मनदीपसिंग आणि लोकेश राहुलच्या तडाखेबंद फलंदाजीमुळे दुसऱ्या ट्‌वेंटी-20 सामन्यामध्ये भारताने झिंबाब्वेवर दहा गडी राखून मात केली. या विजयामुळे तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये 1-1 अशी बरोबरी झाली आहे. भारतीयांच्या भेदक गोलंदाजीसमोर झिंबाब्वेला 99 धावांपर्यंतच मजल मारता आली. हे आव्हान भारताच्या सलामीच्या जोडीने 13.1 षटकांत पार केले. ट्‌वेंटी-20 क्रिकेटमध्ये भारताने प्रथमच दहा गडी राखून विजय मिळविला आहे.

पहिल्या सामन्यात अखेरच्या चेंडूवर विजय मिळविल्यानंतर आत्मविश्‍वास उंचावलेल्या झिंबाब्वेने आज नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. या सामन्यामध्ये भारताने धवल कुलकर्णी आणि बरिंदर स्रान यांना ट्‌वेंटी-20 मध्ये पदार्पण करण्याची संधी दिली. त्यापैकी स्रानने तिसऱ्या षटकापासून झिंबाब्वेला हादरे दिले. त्याने चार षटकांत केवळ दहा धावा देत चार गडी बाद केले. पाचवा गोलंदाज म्हणून आज संधी दिलेल्या जसप्रित बुमराहने चार षटकांत तीन गडी बाद केले. धवल कुलकर्णी आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. झिंबाब्वेकडून यष्टिरक्षक पीटर मूर याने सर्वाधिक 31 धावा केल्या. पूर्ण 20 षटके फलंदाजी केल्याचेच एकमेव समाधान झिंबाब्वेच्या संघाला लाभले.

त्यानंतर मनदीपसिंग आणि लोकेश राहुल यांनी झिंबाब्वेच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजविले. मनदीपसिंगने अर्धशतक झळकाविले, तर राहुल 47 धावांवर नाबाद राहिला.

भारतीय संघ : के. एल. राहुल, मनदीपसिंग, अंबाती रायडू, मनीष पांडे, केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी (यष्टिरक्षक, कर्णधार), अक्षर पटेल, धवल कुलकर्णी, जसप्रित बुमराह, बरिंदर स्रान, युजवेंद्र चहल.

संक्षिप्त धावफलक :
झिंबाब्वे : 20 षटकांत 9 बाद 99

पीटर मूर 31
बरिंदर स्रान 4-0-10-4
जसप्रित बुमराह 4-0-11-3
युजवेंद्र चहल 4-1-19-1
धवल कुलकर्णी 4-0-32-1

भारत : 13.1 षटकांत बिनबान 103
के. एल. राहुल नाबाद 47-40 चेंडू, 2 चौकार, 2 षटकार
मनदीपसिंग नाबाद 52-40 चेंडू, 6 चौकार, 1 षटकार

Web Title: India beat Zimbabwe by 10 wickets