भारताचे क्रिकेटमध्ये ‘वन टू फोर’

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 May 2018

मुंबई -  मोसम संपत असताना आयसीसीने वार्षिक मानांकनाचे अपडेट केले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे अव्वल स्थान आणखी भक्कम झाल्याचे कालच जाहीर झाले. आज इतर प्रकारातील नवी मानांकन क्रमवारी जाहीर झाली. त्यानुसार एकदिवसीय क्रमवारीत भारतीय संघ पहिल्या क्रमांकावरून दुसऱ्या स्थानी गेला आहे. ट्‌वेन्टी-२० मध्ये भारताचे तिसरे स्थान कायम राहिले. तसेच महिलांमध्ये एकदिवसीय क्रमवारीत भारत चौथ्या स्थानी आहे.

थोडक्‍यात भारतीय संघांनी १...२...३...४ अशी लय मिळवली आहे. क्रमवारीतील बदल होण्याचे प्रमुख कारण आहे ते वर्षागणिक बदलणारे मूल्यांकन. २०१४-१५ मधील कामगिरीचे मूल्य काढून टाकण्यात आले तर २०१४-१५ आणि २०१५-१६ मधील कामगिरीचे मूल्य ५० टक्‍क्‍यांनी वाढले आहे. कसोटीमध्ये पुढील दोन वर्षांत भारताने भरीव कामगिरी केली होती. त्यामुळे अव्वल स्थान अधिक भक्कम झाले; मात्र एकदिवसीय सामन्यांमध्ये इंग्लंडने या दोन वर्षांत चांगले यश मिळवल्यामुळे त्यांनी भारताला मागे टाकून पहिला क्रमांक मिळवला. 

जून-जुलै महिन्यात भारत इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. तेथे मालिका जिंकली तर भारताला पुन्हा पहिले स्थान मिळवता येईल. ट्‌वेन्टी-२० मध्ये फार बदल झाले नाहीत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India Cricket ranking