esakal | 2019 World Cup मध्ये भारताची सलामी दक्षिण आफ्रिकेशी! 
sakal

बोलून बातमी शोधा

Virat kohli

2019 World Cup मध्ये भारताची सलामी दक्षिण आफ्रिकेशी! 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पुढील वर्षी इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. मात्र, पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार हा सामना दोन जून रोजी न होता चार जूनला होणार आहे. लोढा समितीच्या शिफारसींनुसार, 'आयपीएल'चा अंतिम सामना आणि आंतरराष्ट्रीय सामना यात किमान 15 दिवसांची विश्रांती ठेवणे अपेक्षित आहे. त्यानुसार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) हा बदल करावा लागणार आहे. 

इंग्लंडमध्ये होणाऱ्या या विश्‍वकरंडक स्पर्धेत भारताकडे संभाव्य विजेता म्हणून आतापासूनच पाहिले जात आहे. ही स्पर्धा 30 मे ते 14 जुलै या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेत दहा संघ असतील आणि साखळी फेरीत एकूण 45 सामने होणार आहेत. प्रत्येक संघ साखळी फेरीत नऊ सामने खेळणार असून दोन्ही गटांमधील पहिले दोन असे एकूण चार संघ बाद फेरीत प्रवेश करतील. 1999 नंतर प्रथमच इंग्लंडमध्ये विश्‍वकरंडक स्पर्धा होत आहे. 

2011 मध्ये भारताने विश्‍वकरंडक स्पर्धा जिंकली होती, तर 2015 मध्ये उपांत्य फेरी गाठली होती. 

"2019 मध्ये 'आयपीएल'चा कालावधी 29 मार्च ते 19 मे असा असेल. पण लोढा समितीच्या शिफारसींनुसार, किमान 15 दिवसांची विश्रांती आवश्‍यक आहे. विश्‍वकरंडक स्पर्धा 30 मेपासून सुरू होत आहे. त्यामुळे, भारताचा पहिला सामना चार जूनलाच होऊ शकतो. यापूर्वीच्या नियोजनानुसार, भारताची सलामीची लढत दोन जून रोजी होणार होती; पण त्यात बदल करावा लागला आहे. यासंदर्भात आता 'आयसीसी'कडे प्रस्ताव सादर करण्यात येईल'', असे 'बीसीसीआय'च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

loading image