इंग्लंडच्या 477 धावांनंतर भारत नाबाद 60

वृत्तसंस्था
शनिवार, 17 डिसेंबर 2016

ग्लंडच्या 477 धावांपुढे भारताचा नेहमीचा सलामीवीर मुरली विजय व के. एल. राहुल यांच्याऐवजी पार्थिव पटेलला सलामीला पाठविण्यात आले. राहुल आणि पटेल यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना यश मिळू न देता दिवसअखेरपर्यंत 60 धावा जमाविल्या.

चेन्नई - इंग्लंडने दुसऱ्या दिवशी 477 धावांचा डोंगर रचल्यानंतर भारतानेही चोख प्रत्युत्तर देत दुसऱ्या दिवसअखेर नाबाद 60 धावा केल्या. के. एल. राहुल 30 आणि पार्थिव पटेल 28 धावांवर खेळत आहेत.

आज 4 बाद 284 वरून पुढे खेळताना इंग्लंडला पहिला धक्का देण्यात अश्विनला यश आले. त्याने बेन स्टोक्सला 6 धावांवर बाद केले. त्यानंतर जोस बटलरही ईशांतच्या गोलंदाजीवर पायचीत बाद झाला. शतकवीर मोईन अली 146 धावांवर परतल्यानंतर डॉसन आणि रशीद यांनी भारतीय गोलंदाजांची परीक्षा पाहिली. या दोघांनी 108 धावांची भागिदारी करत इंग्लंडची धावसंख्या 400 च्या पार नेली. या दोघांनी आपापली अर्धशतकेही पार करत भारतीय फिरकी गोलंदाजांचा यशस्वीपणे सामना केला. अखेर 60 धावांवर रशीदला बाद करण्यात उमेश यादवला यश आले. त्यानंतर स्टुअर्ट ब्रॉड 19 आणि बेल यांनी 12 धावा करून धावसंख्या साडेचारशेच्या पार नेली. मिश्राने बेलला बाद करत इंग्लंडचा डाव संपुष्टात आणला. डॉसन 66 धावांवर नाबाद राहिला.

इंग्लंडच्या 477 धावांपुढे भारताचा नेहमीचा सलामीवीर मुरली विजय व के. एल. राहुल यांच्याऐवजी पार्थिव पटेलला सलामीला पाठविण्यात आले. राहुल आणि पटेल यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना यश मिळू न देता दिवसअखेरपर्यंत 60 धावा जमाविल्या. भारत अद्याप पहिल्या डावात 417 धावांनी पिछाडीवर आहे.

Web Title: India firm in reply to England's 477 in chennai test