आजारी रैनाला वगळले; भारतीय संघ कायम

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 ऑक्टोबर 2016

न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय मालिका संपल्यानंतर लगेचच इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका सुरू होणार आहे. त्यानंतर बांगलादेशविरुद्ध एक कसोटी आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे.

नवी दिल्ली: आगामी कसोटी क्रिकेटचे व्यग्र नियोजन लक्षात घेता आर. आश्‍विन, महंमद शमी आणि रवींद्र जडेजा या तीनही प्रमुख गोलंदाजांना एकदिवसीय क्रिकेटमधून विश्रांती देण्याचा निर्णय निवड समितीने कायम ठेवला. न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी आधीच्या संघात काहीही बदल करण्यात आलेला नाही.

सुरेश रैना अद्यापही आजारी असल्याने त्याला संघातून वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी बदली खेळाडूची निवड झालेली नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या तीनही कसोटी सामन्यांमध्ये खेळलेल्या आश्‍विन, शमी आणि जडेजाला एकदिवसीय मालिकेसाठी निवडलेले नाही. न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय मालिका संपल्यानंतर लगेचच इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका सुरू होणार आहे. त्यानंतर बांगलादेशविरुद्ध एक कसोटी आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे.

संघ :
महेंद्रसिंह धोनी (यष्टिरक्षक, कर्णधार), रोहित शर्मा, अजिंक्‍य रहाणे, विराट कोहली, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, जयंत यादव, अमित मिश्रा, जसप्रित बुमराह, धवल कुलकर्णी, उमेश यादव, मनदीपसिंग, केदार जाधव.

Web Title: India keeps ODI squad same against New Zealand