झिंबाब्बेसमोर विजयासाठी 139 धावांचे लक्ष्य

वृत्तसंस्था
बुधवार, 22 जून 2016

हरारे - झिंबाब्बेविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक "टी 20‘ सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना झिंबाब्बेसमोर 139 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. केदार जाधवच्या 58 धावांच्या खेळीच्या सहाय्याने भारताने निर्धारित 20 षटकांत सहा बाद 138 धावा केल्या.

हरारे - झिंबाब्बेविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक "टी 20‘ सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना झिंबाब्बेसमोर 139 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. केदार जाधवच्या 58 धावांच्या खेळीच्या सहाय्याने भारताने निर्धारित 20 षटकांत सहा बाद 138 धावा केल्या.

आज (बुधवार) नाणेफेक जिंकून झिंबाब्बेने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात निराशाजनक झाली. चौथ्या षटकात भारताचा मनदीप सिंग (6 चेंडूत 4 धावा) डोनाल्ड तिरिपानोच्या गोलंदाजीवर टिमिसेन मारुमाकडे झेल देऊन बाद झाला. त्यानंतर लोकेश राहुल 20 चेंडूत 22 धावा करून त्रिफळाचीत झाला. तर मनीष पांडे एकही धाव न करता तंबूत परतला. त्यानंतर अंबाती रायुडू (26 चेंडूत 20 धावा) बाद झाला. दरम्यान केदार जाधवने एक बाजू सांभाळत धावसंख्या वाढविण्याचा प्रयत्न केला. त्याने एक षटकार आणि सात चौकारांच्या मदतीने 42 चेंडूत 58 धावा केल्या. महेंद्रसिंह धोनी केवळ 9 धावा करून बाद झाला. तर अक्षर पटेल 11 चेंडूत 20 धावा नाबाद राहिला. धवल कुलकर्णीही नाबाद राहिला. 

झिंबाब्बेच्यावतीने डोनाल्ड तिरिपानोने बहारदार गोलंदाजीचे प्रदर्शन करत चार षटकात 20 धावा देऊन तीन बळी घेतले. 

झिंबाब्बेविरुद्धच्या दुसऱ्या "टी 20‘ सामन्यात भारताच्या बरिंदर स्रान आणि जसप्रित बुमराहच्या भेदक गोलंदाजीमुळे आणि मनदीपसिंग आणि लोकेश राहुलच्या तडाखेबंद फलंदाजीमुळे भारताने दहा गडी राखून मात केली होती. त्यामुळे तीन सामान्यांच्या मालिकेत भारताने 1-1 अशी बरोबरी साधली होती. त्यामुळे आजचा तिसरा आणि शेवटचा सामना निर्णायक ठरणार आहे. 
 

Web Title: India Set target of 139