भारत अ संघाची इंग्लंडवर मात 

वृत्तसंस्था
Tuesday, 19 June 2018

संक्षिप्त धावफलक 
भारत अ ः 50 षटकांत 8 बाद 328 (पृथ्वी शॉ 70-61 चेंडू, 7 चौकार, 3 षटकार, श्रेयस अय्यर 54-45 चेंडू, 5 चौकार, 1 षटकार, ईशान किशन 50-46 चेंडू, 4 चौकार, 2 षटकार, कुणाल पंड्या 34-28 चेंडू, 2 चौकार, 2 षटकार, रेयान हिगिंस 50-4) वि. वि. इंग्लंड क्रिकेट मंडळ संघ ः 36.5 षटकांत सर्वबाद 203 (बेन स्लॅटर 37-38 चेंडू, 6 चौकार, 1 षटकार, मॅट क्रिटच्ले 40-48 चेंडू, 4 चौकार, दीपक चहर 48-3, अक्षर पटेल 21-2, कुणाल पंड्या 21-1). 

लंडन - मायदेशात आयपीएल गाजवणाऱ्या श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, ईशान किशन आणि दीपक चहर यांनी इंग्लंडमध्येही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. भारत अ संघाने पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंड मंडळाच्या संघाचा तब्बल 125 धावांनी पराभव केला. त्रिशतकी मजल मारणाऱ्या भारतीयांनी इंग्लंड संघाला 37 षटकांतच गुंडाळले. 

मुंबईकर पृथ्वी शॉने तडाखेबंद 70 धावांची खेळी करून भारत अ संघाच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि ईशान किशन यांनीही वेगवान अर्धशतके झळकावली. ईशानचा मुंबई इंडियन्स संघातील सहकारी कुणाल पंड्यानेही 34 धावांचे योगदान दिले. त्यामुळे भारत अ संघाने प्रथम फलंदाजी करताना 328 धावा केल्या. 

इंग्लंड संघाला हे आव्हान पेलवताच आले नाही. त्यांचा निम्मा संघ 126 धावांत बाद करून भारतीयांनी विजय निश्‍चित केला. आयपीएलमध्ये विजेत्या चेन्नई संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज दीपक चहरने तीन विकेट मिळवल्या. त्यानंतर अक्षर पटेलने दोन आणि इतर सर्व गोलंदाजांनी प्रत्येकी एकेक विकेट मिळवून संघाच्या विजयात हातभार लावला. 

संक्षिप्त धावफलक 
भारत अ ः 50 षटकांत 8 बाद 328 (पृथ्वी शॉ 70-61 चेंडू, 7 चौकार, 3 षटकार, श्रेयस अय्यर 54-45 चेंडू, 5 चौकार, 1 षटकार, ईशान किशन 50-46 चेंडू, 4 चौकार, 2 षटकार, कुणाल पंड्या 34-28 चेंडू, 2 चौकार, 2 षटकार, रेयान हिगिंस 50-4) वि. वि. इंग्लंड क्रिकेट मंडळ संघ ः 36.5 षटकांत सर्वबाद 203 (बेन स्लॅटर 37-38 चेंडू, 6 चौकार, 1 षटकार, मॅट क्रिटच्ले 40-48 चेंडू, 4 चौकार, दीपक चहर 48-3, अक्षर पटेल 21-2, कुणाल पंड्या 21-1). 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India A team beat England