जडेजा, अश्विनला विश्रांतीच; उमेश यादव, शमीचा समावेश

वृत्तसंस्था
Sunday, 10 September 2017

संघ पुढीलप्रमाणे : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के. एल. राहुल, मनीष पांडे, केदार जाधव, अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, मोहम्मद शमी.

मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी आज (रविवार) भारतीय संघाची निवड करण्यात आली असून, आर. अश्विन आणि रवींद्र जडेजाला विश्रांतीच देण्यात आली आहे. तर, शार्दुल ठाकूरच्या जागी उमेश यादवचा समावेश करण्यात आला आहे.

भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच एकदिवसीय आणि तीन ट्वेंटी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेला 17 सप्टेंबरपासून चेन्नईत होणाऱ्या एकदिवसीय सामन्यापासून सुरवात होणार आहे. भारतीय संघ नुकताच श्रीलंकेत खेळून आला आहे. भारतीय संघाने श्रीलंकेत कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेंटी-20 सामने जिंकून निर्भैळ यश मिळविले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

संघ व्यवस्थापनाने श्रीलंकेतील विजयी संघ कायम ठेवताना अश्विन आणि जडेजा या फिरकीपटूंना विश्रांतीच दिली आहे. तर, शार्दुल ठाकूरच्या जागी उमेश यादवचा संघात समावेश केला आहे. 

संघ पुढीलप्रमाणे : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के. एल. राहुल, मनीष पांडे, केदार जाधव, अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, मोहम्मद शमी.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India team for first 3 ODIs against Australia announced; Axar , Kuldeep, Chahal, Bumrah, Bhuvi, Umesh & Shami