भारताच्या तीन कसोटी संशयाच्या भोवऱ्यात

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 May 2018

नवी दिल्ली / मुंबई - खेळपट्टीचे स्वरूप बदलण्याच्या स्वरूपावरून अल जझिराने केलेल्या स्टिंगबाबतची चौकशी आयसीसीने सुरू केली आहे. त्यात भारताच्या तीन कसोटी आहेत, तसेच मुंबईचा माजी क्रिकेटपटू रॉबिन मॉरिस याचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

अल जझिराच्या वृत्तानुसार भारताच्या श्रीलंका (गॅली, २६ ते २९ जुलै २०१७), ऑस्ट्रेलिया (रांची, १६ ते २० मार्च २०१७) आणि इंग्लंडविरुद्धच्या (चेन्नई, १६ ते २० डिसेंबर २०१६) कसोटी संशयाच्या भोवऱ्यात आहेत. यापैकी गॅली आणि चेन्नईची कसोटी भारताने जिंकली होती, तर रांची कसोटी अनिर्णित राहिली होती. 

आयसीसीने चौकशी सुरू केली आहे. ते रॉबिन मॉरिसबाबत काय निर्णय घेतात, त्यानुसार आम्ही निर्णय घेणार आहोत, असे भारतीय मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मॉरिसचा भारतीय मंडळाच्या कोणत्याही योजनेत सहभाग नाही. दोषी ठरल्यास भारतीय मंडळ केवळ त्याचे पेन्शन रद्द करू शकेल.

रॉबिन मॉरिस, तसेच पाकिस्तानचा क्रिकेटपटू हसन रझा यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचे सांगितले जात आहे. रॉबिन मॉरिस हा शारदाश्रमकडून खेळला आहे. त्याने ३१ व्या वर्षीच निवृत्ती घेतली आणि इंडियन क्रिकेट लीगबरोबर करारबद्ध झाला होता. त्याची जीवनशैली अचानक उंचावली होती, याकडे काही माजी क्रिकेटपटूंनी लक्ष वेधल्याचे वृत्त आहे. मॉरिसने त्याचा मोबाईल बंद केला आहे, तसेच फेसबुक अकाउंटही डिलीट केला असल्याचे समजते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india three test cricket match in dispute