भारतीय संघ विंडीजमध्ये वनडे, टी-20 खेळणार

वृत्तसंस्था
बुधवार, 17 मे 2017

मालिकेचा कार्यक्रम -

 • पहिला एकदिवसीय सामना - 23 जून 
 • दुसरा एकदिवसीय सामना - 25 जून
 • तिसरा एकदिवसीय सामना - 30 जून
 • चौथा एकदिवसीय सामना - 4 जुलै
 • पाचवा एकदिवसीय सामना - 6 जुले
   
 • ट्वेंटी-20 सामना - 9 जुलै

नवी दिल्ली - जूनमध्ये होणाऱ्या चँपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेनंतर भारतीय संघ वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर जाणार असून, या दौऱ्यात एकदिवसीय व ट्वेंटी-20 मालिका खेळविण्यात येणार आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या दौऱ्याबाबत माहिती दिली. भारतीय संघाच्या विंडीज दौऱ्याची सुरवात 23 जूनपासून एकदिवसीय मालिकेद्वारे होणार आहे. पोर्ट ऑफ स्पेन येथे 23 जूनला पहिला एकदिवसीय सामना होणार आहे. पाच एकदिवसीय सामने आणि एक ट्वेंटी-20 सामना या दौऱ्यात खेळविला जाणार आहे.

मालिकेचा कार्यक्रम -

 • पहिला एकदिवसीय सामना - 23 जून 
 • दुसरा एकदिवसीय सामना - 25 जून
 • तिसरा एकदिवसीय सामना - 30 जून
 • चौथा एकदिवसीय सामना - 4 जुलै
 • पाचवा एकदिवसीय सामना - 6 जुले
   
 • ट्वेंटी-20 सामना - 9 जुलै
Web Title: India to tour West Indies for five ODIs, one T20I next month