esakal | U 19 World Cup : भारताने उडवला ऑस्ट्रेलियाचा धुव्वा; उपांत्य फेरीत मजल
sakal

बोलून बातमी शोधा

India U19 vs Australia : India beat Australia by 74 runs to enter semis
  • भारताने उडवला ऑस्ट्रेलियाचा धुव्वा
  • ​19 वर्षांखालील विश्‍वकरंडक स्पर्धेत उपांत्य फेरीत मजल

U 19 World Cup : भारताने उडवला ऑस्ट्रेलियाचा धुव्वा; उपांत्य फेरीत मजल

sakal_logo
By
वृत्तसेवा

पोचेस्ट्रॉम : संकटात सापडलेल्या फलंदाजीला सारवत उभारलेली समाधानकारक धावसंख्या त्यानंतर गोलंदाजांनी केलेली कमाल यामुळे भारतीय युवकांनी ऑस्ट्रेलियाला पाणी पाजले आणि 19 वर्षांखालील विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत उपांत्यपूर्व सामन्यात 74 धावांनी विजय मिळवला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

6 बाद 144 अशी अवस्था झालेल्या भारताने 233 धावांपर्यंत मजल मारली यामध्ये यशस्वी जैसवाल (62) आणि अर्थव अंकोलेकर (55) यांचे अर्धशतकी योगदान भारताला 233 धावांचे पाठबळ देणारे ठरले त्यानंतर 3 बाद 4 आणि 4 बाद 17 असे ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडून त्यांना विजयाच्या विचारापासून दूरच ठेवले. वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागीचे पहिलेच षटक ऑस्ट्रेलियाची दाणादाण उडवणारे ठरले. 

शेरजील इमाम आपल्या राष्ट्रद्रोही भाषणात नेमका काय म्हणाला?

पहिल्याच चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा सलामीवर जे फ्रेझर धावचीत झाला आणि तेथून त्यांच्या डावाला गळती लागली. त्यागीने आपल्या या पहिल्या षटकात मकेन्झी हार्वी लाचन हेम यांना बाद केले. पहिल्याच षटकात ऑस्ट्रेलियाची 3 बाद 4 अशी अवस्था झाली होती. त्यानंतर त्यागीने ऑस्ट्रेलियाचे आणखी दोन फलंदाज बाद केले. बघता बघता त्यांचा निम्मा संघ 68 धावांत गारद झाला त्यानंतर सॅम फ्लेमिंग आणि लियम स्कॉट यांनी बचावकार्य सुरु केले. पण आवश्‍यक धावांची वाढती सरासरी त्यांच्यावरचे दडपण वाढवत होते फ्लेमिंगचा संयम सुटल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या फलंदाजांनीही शरणागती स्वीकारली. 

पोलिस असल्याचे सांगत सख्ख्या बहिणींवर बलात्कार

तत्पूर्वी यसस्वी जैसवाल आणि दिवांश सक्‍सेना या मुंबईकरांनी भारताला 35 धावांची सलामी दिली होती, पण 6 बाद 144 अशी अवस्था झाल्यावर भारताला दोनशे धावांचा टप्पाही अशक्‍य वाटत होता. सातव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या अष्टपैलून अंकोलेकरने डाव सावरण्याबरोबर आक्रमणही केले त्याने 54 चेंडूत 55 धावांची निर्णायक खेळी उभारली रवी बिश्‍णोईने 31 चेंडूत 30 धावांचे योगदान दिले त्यामुळे भारताला 233 धावांपर्यंत मजल मारता आली. 

ऑस्ट्रेलियावर सलग पाचवा विजय 
ऑस्ट्रेलियाचा संघ कितीही ताकदवर असला तरी भारताने 19 वर्षांखालील विश्‍वकरंडक स्पर्धेत सलग पाचव्या स्पर्धेत विजय मिळवला आहे. 2000 च्या स्पर्धेपासून विजयाची ही मालिका सुरु झालेली आहे. 

संक्षिप्त धावफलक 
भारत ः 50 षटकांत 9 बाद 233 (यशस्वी जैसवाल 62 -82 चेंडू, 6 चौकार, 2 षटकार, अर्थव अंकोलेकर नाबाद 55 -54 चेंडू, 5 चौकार, 1 षटकार, रवी बिश्‍णोई 30 -31 चेंडू, 1 चौकार, 1 षटकार, कॉरी केरी 45-2, टॉड मर्फी 40-2) वि. वि. ऑस्ट्रेलिया ः 43.3 षटकांत सर्वबाद 149 (सॅम फ्लेमिंग 75, लियम स्कॉट 35, कार्तिक त्यागी 24-4, आकाश सिंग 30-3)