भारत-पाक क्रिकेट संघ बांगलादेशात आमने-सामने 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील थेट मालिका बंद झाल्या असल्या, तरी दोन्ही देशांतील लढती थांबण्यास तयार नाहीत. आता बांगलादेशातील इमर्जिंग कप लढतीच्या निमित्ताने भारत आणि पाक संघात लढत होईल. 

आशियाई स्तरावरील ही स्पर्धा प्रामुख्याने 23 वर्षांखालील संघात असते. मात्र, आता या स्पर्धेत कसोटी दर्जा असलेल्या संघांना चार आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश करण्यास मुभा असते, तर अफगाणिस्तान, संयुक्त अरब अमिराती, हॉंगकॉंग आणि नेपाळचे राष्ट्रीय संघ या स्पर्धेत सहभागी होतील. 

भारताचा या स्पर्धेत नक्कीच सहभाग असेल. ही आशियाई क्रिकेट परिषदेची स्पर्धा आहे. त्यामुळे यापासून दूर राहण्याचा काही प्रश्‍नच येत नाही. भारत-पाकिस्तान मालिका वेगळी आणि या लढती वेगळ्या असे भारतीय क्रिकेट मंडळाच्या प्रतिनिधींनी सांगितल्याचे वृत्त आहे. चॅंपियन्स करंडक स्पर्धेपूर्वीची ही स्पर्धा आहे, त्यामुळे अनेक संघ आपल्या नवोदितांची चाचणी या स्पर्धेत करतील, अशी अपेक्षा आहे. 

भारतीय मंडळाने केवळ नवोदितांचाच संघ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. चार आंतरराष्ट्रीय खेळाडू पाठवण्याचा सध्या आम्ही विचारही केलेला नाही, असे भारतीय पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: India versus Pakistan cricket Bangladesh