esakal | ऑस्ट्रेलियालाच्या सलामीवीरांना भुवनेश्वरने धाडले माघारी
sakal

बोलून बातमी शोधा

India vs Australia 3rd ODI Live Score: Bhuvneshwar Kumar dismisses australian openers

ऑस्ट्रेलियालाच्या सलामीवीरांना भुवनेश्वरने धाडले माघारी

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मेलबर्नः भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आज (शुक्रवार) तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना सुरू आहे. सामना सुरू झाल्यानंतर भुवनेश्वर कुमारने ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर केरी व फिंचला माघारी धाडले.

तीन सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना यजमान ऑस्ट्रेलियाने जिंकला, तर दुसरा सामना भारताने जिंकला. त्यामुळे तिसरा सामना निर्णायक ठरणार आहे. या सामन्यासाठी विजय शंकर याला संघात स्थान देण्यात आले आहे. यासह केदार जाधव, युझवेंद्र चहललाही संधी देण्यात आली आहे.

आत्मविश्वास बळावलेला भारतीय संघ शुक्रवारी तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध बाजी मारुन दौऱ्याचा ऐतिहासिक शेवट करण्याच्या निर्धाराने सज्ज झाला आहे. भारतानं ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकून इतिहास घडवला. असाच विक्रम एकदिवसीय मालिकेत घडेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

भारताने ऑस्ट्रेलियात कधीही द्विपक्षीय एकदिवसीय मालिका जिंकलेली नाही. 1985 मध्ये विश्व चॅम्पियनश्पि तसेच 2008 मध्ये सीबी मालिका जिंकली होती. गेल्यावेळी 2016 मध्ये भारताला येथे एकदिवसीय मालिका 1-4 अशी गमवावी लागली. भारतानं आजचा सामना जिंकल्यास 2018-19 च्या दौऱ्यात एकही मालिका न गमावण्याचा विक्रम भारताच्या नावावर जमा होईल.

loading image