दुसऱ्या 'वन-डे'त भारताचा इंग्लंडकडून पराभव

शनिवार, 14 जुलै 2018

ज्यो रूटने तंत्रशुद्ध फलंदाजी करून शतक केले. रूटला तळात डेव्हीड विलीने चांगली साथ दिली. विलीने मोठे फटके मारत ५०  धावा केल्या. सातव्या विकेटकरता दोघांनी केलेली ८३ धावांची भागीदारी इंग्लंड धावसंख्येला आकार आला.  शेवटच्या दहा षटकात गोलंदाजांनी थोडा स्वैर मारा केला ज्याचा फायदा रूट - विलीने ९४ धावा काढून घेतला. ५० षटकांचा खेळ झाला असताना इंग्लंडच्या नावासमोर ७ बाद ३२२ धावसंख्या उभी राहिली होती.

लंडन :   लॉर्डस मैदानावरच्या फलंदाजीला पोषक खेळपट्टीचा इंग्लिश फलंदाजांनी फायदा घेत ७ बाद ३२२ धावसंख्या उभारली. ज्यो रूटने ११३ धावांची खेळी रचून मोलाचा वाटा उचलला. ज्यो रूटने डेव्हीड विलीबरोबर सातव्या विकेटकरता  ८३ धावांची मोलाची भागीदारी इंग्लंड धावसंख्येला आकार देऊन गेली. भारतीय संघाचे प्रयत्न तोकडे पडायला प्रमुख फलंदाजांची कमजोर कामगिरी आणि मोठी भागीदारी न होणे कारण ठरली. लॉर्डस् सामना ८६ धावांच्या दणदणीत फरकाने जिंकून इंग्लंड संघाने एक दिवसीय मालिकेत १-१  बरोबरी साधली. शतकवीर ज्यो रूट सामन्याचा मानकरी ठरला. 

 

नाणेफेक  जिंकून इयॉन मॉर्गनने फलंदाजी करायचा निर्णय घेतला तेव्हा बर्‍याच लोकांना आश्चर्य वाटले. भारतीय संघ मोठ्या धावसंख्येचा वारंवार यशस्वी पाठलाग करतो हे माहीत असून मॉर्गनने फलंदाजी करायचे ठरवले.

जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टोच्या जोडीने नेहमीप्रमाणे संघाला झकास सुरुवात करून दिली. जोडी फोडायला अखेर कुलदीपचे ब्रम्हास्त्र कामाला आले. पहिल्याच षटकात कुलदीपने जॉनी बेअरस्टोला बोल्ड केले तर जेसन रॉयला मोठा फटका  मारायच्या मोहात पाडले. 

इयॉन मॉर्गन आणि ज्यो रूटची जोडीने योग्य वेळी शतकी भागीदारी केल्यावर मॉर्गन बाद झाला तो चेंडू फुलटॉस होता. कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहलने चेंडूला उंची देण्याची हिंमत दाखवली ज्याचे माजी खेळाडू कौतुक करत होते. ज्यो रूटने तंत्रशुद्ध फलंदाजी करून शतक केले. रूटला तळात डेव्हीड विलीने चांगली साथ दिली.  सातव्या विकेटकरता दोघांनी केलेली ८३  धावांची भागीदारी इंग्लंड धावसंख्येला आकार आला. कुलदीप यादवने ३ फलंदाजांना बॅड केले.  

मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताचे पहिले तीन फलंदाज लवकर बाद झाले. रोहित शर्माने वेगवान गोलंदाजाला पुढे सरसावत फटका मारायच्या प्रयत्नात विकेट गमावली. शिखरने चांगली सुरुवात करून झेल दिला. लोकेश राहुलला जम बसवायच्या आत तंबूत परतावे लागले. विराट कोहलीने सुरेश रैना सोबत ८० धावांची भागीदारी करून भारताच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. मोईन अलीने विराटला ४५ धावांवर बाद केल्यावर पाठलाग ढिला पडू लागला. 

धावगतीचे ओझे वाढले होते त्याच दडपणात सुरेश रैना बाद झाला. हार्दिक पंड्याला मोठी छाप पाडता आली नाही. तळात एकटा धोनी मैदानावर उभा होता. सामना भारतीय संघापासून लांब गेला होता हे जाणून धोनीने इंग्लंडला अनावश्यक लवकर यश मिळून दिले नाही. ३७ धावा करून धोनी बाद झाल्यावर उरला सुरला प्रतिकार संपला. लियाम प्लंकेटने ४ भारतीय फलंदाजांना तंबूत पाठवले.  इंग्लंड संघाने दुसरा सामना ८६ फरकाने जिंकून जोरदार पुनरागमन केले.

 

 

Web Title: India vs England 2nd ODI at Lords Joe Root century