इंग्लंडसमोर विजयासाठी 405 धावांचे आव्हान

वृत्तसंस्था
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

आज (रविवार) सामन्याच्या चौथ्या दिवशी अजिंक्य रहाणेच्या रुपाने भारताला पहिला झटका बसला. स्टुअर्ट ब्रॉडने रहाणेला 26 धावांवर बाद केले. त्यानंतर अश्विनही ब्रॉडचाच शिकार ठरला.

विशाखापट्टणम - कर्णधार विराट कोहलीने पहिल्या डावातील शतकी खेळीपाठोपाठ दुसऱ्या डावातही केलेल्या अर्धशतकी (81 धावा) खेळीमुळे भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडसमोर विजयासाठी 405 धावांचे खडतर आव्हान ठेवले आहे. भारताच्या दुसरा डाव 204 धावांवर संपुष्टात आला. भारताला पहिल्या डावात 200 धावांची आघाडी मिळाली होती.

आज (रविवार) सामन्याच्या चौथ्या दिवशी अजिंक्य रहाणेच्या रुपाने भारताला पहिला झटका बसला. स्टुअर्ट ब्रॉडने रहाणेला 26 धावांवर बाद केले. त्यानंतर अश्विनही ब्रॉडचाच शिकार ठरला. साहाला रशीदने पायचीत बाद केले. त्यामुळे भारताची 6 बाद 130 अशी स्थिती झाली. कोहली शतक पूर्ण करेल असे वाटत असतानाच रशीदच्या गोलंदाजीवर स्लीपमध्ये स्टोक्सने स्लीपमध्ये सुरेख झेल टिपला. त्यापाठोपाठ जडेजा आणि उमेश यादव हेही झटपट बाद झाले. जयंत यादव आणि महंमद शमीने फायदेशीर धावा जोडत संघाला मोठ्या धावसंख्येकडे नेले.

त्यापूर्वी तिसऱ्या दिवशी रविचंद्रन आश्‍विनला काही वेळा गोलंदाजीमध्ये सूर सापडायला थोडा वेळ लागतो. पण एकदा सूर गवसला, की त्याच्यासमोर कुठलाही फलंदाज तग धरू शकत नाही, हे सिद्ध झाले. पहिल्या डावात 200 धावांची आघाडी घेणाऱ्या भारताने दिवसअखेर तीन गडी गमावून 98 धावा केल्या होत्या. दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी आश्‍विनने पाच विकेट घेत इंग्लंडच्या फलंदाजांना आपल्या तालावर नाचवले. भेदक, वेगवान आणि अचूक गोलंदाजी करत उमेश यादवनेही इंग्लिश फलंदाजांना त्रस्त केले.

Web Title: India vs England 2nd test in Visakhapatnam