रोहित शर्माचे शतक हुकले; भारताचा धावांचा पाऊस

Wednesday, 27 June 2018

डब्लीन - शिखर धवन आणि रोहित शर्माच्या तडाखेबाज फलंदाजीने आयरीश गोलंदाजांची दाणादाण उडाली. डब्लीनच्या मॅलाहाईड मैदानावर झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम  गोलंदाजी करायचा धाडसी निर्णय आयर्लंड कर्णधाराच्या अंगाशी आला.

डब्लीन - शिखर धवन आणि रोहित शर्माच्या तडाखेबाज फलंदाजीने आयरीश गोलंदाजांची दाणादाण उडाली. डब्लीनच्या मॅलाहाईड मैदानावर झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम  गोलंदाजी करायचा धाडसी निर्णय आयर्लंड कर्णधाराच्या अंगाशी आला.

शिखर धवन आणि रोहित शर्मा जोडीने सलामीला येऊन अशी काही आक्रमक फलंदाजी केली की आयर्लंडच्या संघाला धक्‍क्‍यातून सावरताच आले नाही. 20 षटकांच्या खेळात भारतीय संघाने 5 बाद 208 अशी मजबूत धावसंख्या उभारली ती रोहित शर्मा (97  धावा)आणि शिखर धवनच्या(74 धावा) खेळी मुळेच.  मॅलाहाईड मैदानाची खेळपट्टी फलंदाजीला पोषक होती. समोर आलेल्या एकाही गोलंदाजाचा धवन- शर्मा जोडीने आदर ठेवला नाही. दोघा फलंदाजांनी चौकार षटकारांची माळ लावत अर्धशतके साजरी केली. जेमतेम 9हजार प्रेक्षक सामन्याला हजर होते पण प्रेक्षागृह खचाखच भरले होते. त्यात जास्त करून भारतीय पाठीराखे जास्त होते. फलंदाजांच्या प्रत्येक फटक्‍याला कोणी ढोल वाजवून तर कोणी तिरंगा फडकावून भरभरून दाद देत होते. 5 चौकार 5 षटकार ठोकून शिखर धवन 74 धावांवर बाद झाला तेव्हा पहिले यश गोलंदाजांना लाभले. शिखरला बाद केल्याचा राग रोहित शर्माने जणू गोलंदाजांवर काढला. 61 चेंडूत 8 चौकार आणि 97 उत्तुंग षटकार मारणाऱ्या रोहितचे शतक मात्र हुकले. पीटर चेसने शेवटच्या षटकात धोनी- रोहित शर्मा आणि विराट कोहलीला बाद करून कमाल केली. 5 बाद 208 धावा करून भारतीय संघाने दौऱ्याची सुरुवात झकास केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India vs Ireland Rohit Sharma missed a century T20