भारताची न्यूझीलंडवर 35 धावांनी मात; 4-1 ने मालिका जिंकली

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 3 February 2019

कमी धावसंख्येतही भारतीय गोलंदाजांनी सर्वोत्तम गोलंदाजीचे प्रदर्शन करत न्यूझीलंडचा डाव 217 धावांत संपुष्टात आणून पाचव्या एकदिवसीय सामन्यात 35 धावांनी विजय मिळविला. या विजयामुळे भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 4-1 असा विजय मिळविला.

वेलिंग्टन : कमी धावसंख्येतही भारतीय गोलंदाजांनी सर्वोत्तम गोलंदाजीचे प्रदर्शन करत न्यूझीलंडचा डाव 217 धावांत संपुष्टात आणून पाचव्या एकदिवसीय सामन्यात 35 धावांनी विजय मिळविला. या विजयामुळे भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 4-1 असा विजय मिळविला.

चौथ्या सामन्याप्रमाणे पाचव्या सामन्यातही भारताच्या प्रमुख फलंदाजांनी नांगी टाकली मात्र अंबाती रायडू आणि विजय शंकर यांच्या भागीदारीमुळे भारताला न्यूझीलंडसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. हार्दिक पंड्याने अखेरच्या षटकांमध्ये जोरदार फटकेबाजी करत भारताला 252 धावांपर्यंत मजल मारू शकला. या आव्हानासमोर खराब सुरवात झालेल्या न्यूझीलंडचा संघ भारतीय गोलंदाजांमुळे 217 धावांच करू शकला. भारताने सलग मालिका जिंकण्याचा धडाका कायम ठेवला आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

न्यूझीलंडचा धुव्वा; भारताचे 4-1 ने यश


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India vs New Zealand 5th ODI India beat New Zealand by 35 runs