World Cup 2019 : भारत-पाक सामना होणार पण...

वृत्तसंस्था
Sunday, 16 June 2019

विश्वकरंडक स्पर्धेला सुरवात झाल्यापासून सर्वांना भारत-पाकिस्तान सामन्याची उत्त्सुकता आहे. पावसामुळे सामना होणार की नाही या एकच प्रश्न असला तरी याचे उत्तर मिळाले असून असून सामना होणार आहे. भारत-पाकिस्तान सामना वेळेवर सुरु होणार आहे. मात्र हा सामना 50 षटकांचा होणार की नाही हे अद्याप निश्चित नाही. कारण सायंकाळी 5-7च्या सुमारास पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : विश्वकरंडक स्पर्धेला सुरवात झाल्यापासून सर्वांना भारत-पाकिस्तान सामन्याची उत्त्सुकता आहे. पावसामुळे सामना होणार की नाही या एकच प्रश्न असला तरी याचे उत्तर मिळाले असून असून सामना होणार आहे. भारत-पाकिस्तान सामना वेळेवर सुरु होणार आहे. मात्र हा सामना 50 षटकांचा होणार की नाही हे अद्याप निश्चित नाही. कारण सायंकाळी 5-7च्या सुमारास पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 
 

शनिवारी सतत होणाऱ्या पावसामुळं दोन्ही संघांना सराव करता आला नाही. मात्र, हा सामना सुरळीत पार पडावा यासाठी जगभरातून देवाला साकडे घातले जात आहे. सध्या मॅंचेस्टरमध्ये आकाश निरभ्र असून, सामना रद्द होणार नाही असे वाटत असले तरी पावसाची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या एक-दोन दिवसात मॅचेस्टरमध्ये पावसाच्या बारीक सरी आल्या आहे. त्यामुळं भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना वेळेवर सुरु होण्याची शक्यता आहे. अडीच वाजता नाणेफेक होईल, त्यानंतर तीन वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. मात्र, संध्याकाळच्या सुमारास पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द झाला तर त्याचा सगळ्यात जास्त फटका हा आयसीसीला बसणार आहे. त्यामुळं हा सामना होईल याची दक्षता आयसीसीकडून घेण्यात येत आहे. सध्या ग्राऊंण्ड स्टाफ मैदान साफ करत आहेत. कृत्रीमरित्या मैदान सुखे कसे राहिल याची काळजी घेतली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india vs pakistan match may get affected due to rain in manchester