धवनऐवजी राहुल; रोहितला आणखी एक संधी?

वृत्तसंस्था
Thursday, 11 January 2018

केपटाऊन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला 72 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. गोलंदाजांनी चांगली कामगिरी करूनही फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे पराभव झाल्याने जोरदार टीका करण्यात आली होती. त्यामुळे आता संघात धवनला वगळून राहुलला स्थान देण्यात आले आहे.

जोहान्सबर्ग - पहिल्या कसोटीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघात सलामीवीर शिखर धवनऐवजी के. एल. राहुलला संधी देण्यात आली आहे. तर, रहाणेला दुसऱ्या कसोटीतही स्थान न देता रोहित शर्मा संघात कायम राहण्याची शक्यता आहे.

केपटाऊन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला 72 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. गोलंदाजांनी चांगली कामगिरी करूनही फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे पराभव झाल्याने जोरदार टीका करण्यात आली होती. त्यामुळे आता संघात धवनला वगळून राहुलला स्थान देण्यात आले आहे. तर, रहाणे दुसऱ्या कसोटीतही संघाबाहेरच असण्याची शक्यता आहे. कारण, संघ व्यवस्थापन रोहित शर्माला आणखी एक संधी देण्याच्या तयारीत आहे.

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही धवन आणि शर्माच्या समावेशाबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. भारतीय संघ दुसऱ्या कसोटीतही पाच गोलंदाजांसह उतरणार आहे. गोलंदाजीमध्ये कोणताही बदल होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे अनुभवी ईशांत शर्मा आणि उमेश यादव यांना बाहेरच बसावे लागणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India vs South Africa KL Rahul to replace Shikhar Dhawan for 2nd Test Rohit may get another chance