विंडिजकडून भारताचा दारुण पराभव; लुईसचे शतक

वृत्तसंस्था
सोमवार, 10 जुलै 2017

संक्षिप्त धावफलक -
भारत 20 षटकांत 6 बाद 190 (विराट कोहली 39, शिखर धवन 23, रिषभ पंत 38, दिनेश कार्तिक 48, रवींद्र जडेजा नाबाद 13, आर. अश्‍विन नाबाद 11, जेर्मी टेलर 2-31, केस्रिक विल्यम्स 2-42) पराभूत वि. विंडीज 18.3 षटकांत 1 बाद 194 (ख्रिस गेल 18, इव्हीन लुईस नाबाद 125, मार्लोन सॅम्युएल्स नाबाद 36)

किंग्स्टन (जमैका) - विंडीजचा सलामीवीर इव्हीन लुईसने झळकाविलेल्या तडाखेबंद शतकाच्या जोरावर विडींजने भारताचा एकमेव ट्वेंटी-20 सामन्यात नऊ गडी राखून दारुण पराभव केला.

पहिल्या चार फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारताला विंडिजसमोर 191 धावांचे आव्हान ठेवता आले होते. विंडीजने हे आव्हान 19 व्या षटकातच अवघ्या एक गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले.

प्रथम फलंदाजी करताना पहिल्या चार फलंदाजांनी पंधराव्या षटकापर्यंत राखलेला षटकामागे दहा धावांचा वेग अन्य फलंदाजांना राखता आला नाही. अखेरच्या षटकात रवींद्र जडेजा आणि अश्‍विन यांनी 18 धावा घेतल्या. त्यापूर्वी सलामीला कर्णधार कोहलीने 22 चेंडूंत 39, शिखर धवनने 12 चेंडूंत 23, त्यानंतर रिषभ पंतने 35 चेंडूंत 38, दिनेशन कार्तिकने 29 चेंडूंत 48 धावा केल्या. त्यामुळे भारताने विंडीजसमोर 191 धावांचे आव्हान ठेवता आले.

या आव्हानासमोर विंडीजचे सलामीवीर ख्रिस गेल आणि लुईस यांनी आक्रमक सुरवात केली. विंडीजचे फलंदाज भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत असताना भारताला गेलला बाद करण्यात यश आले. त्यानंतर सॅम्युएल्सच्या साथीने लुईस भारतीय गोलंदाजांवर तुटून पडला. त्याने 62 चेंडूत 6 चौकार आणि 12 षटकारांसह 125 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. सॅम्युएल्सने 29 चेंडूत 36 धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक -
भारत 20 षटकांत 6 बाद 190 (विराट कोहली 39, शिखर धवन 23, रिषभ पंत 38, दिनेश कार्तिक 48, रवींद्र जडेजा नाबाद 13, आर. अश्‍विन नाबाद 11, जेर्मी टेलर 2-31, केस्रिक विल्यम्स 2-42) पराभूत वि. विंडीज 18.3 षटकांत 1 बाद 194 (ख्रिस गेल 18, इव्हीन लुईस नाबाद 125, मार्लोन सॅम्युएल्स नाबाद 36)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India vs West Indies T20: West Indies beat India after Evin Lewis’ unbeaten 125