फिरकीपटूंसमोर इंग्लंडची नांगी; भारताचा विजय

वृत्तसंस्था
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

विशाखापट्टण - रवीचंद्रन आश्विन, रवींद्र जडेजा आणि जयंत यादव या फिरकीपटूंनी इंग्लंडच्या फलंदाजांना आज (सोमवार) अखेरच्या दिवशी आपल्या जाळ्यात ओढल्याने भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडवर 246 धावांनी विजय मिळविला. या विजयामुळे भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

आज सामन्याच्या अखेरच्या दिवशी 2 बाद 87 वरून पुढे खेळताना बेन डकेटला आश्विनने सुरवातीला बाद केले. त्यापाठोपाठ मोईन अलीही जडेजाचा शिकार ठरला. स्टोक्सलाही यादवने त्रिफळाबाद केल्याने इंग्लंडची अवस्था 5 बाद 115 अशी झाली. ज्यो  रुटने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण, शमीने त्याला पायचीत बाद करत मोठा अडसर दूर केला. फिरकीपटूंनी इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांना खेळपट्टीवर स्थिरावू दिले नाही. त्यामुळे इंग्लंडचा डाव 158 धावांवर संपुष्टात आला. भारताकडून आश्विन व यादवने प्रत्येकी 3, जडेजा व शमीने दोन बळी मिळविले. पहिला सामना अनिर्णित राहिल्यानंतर दुसरा सामन्यात भारताने विजय मिळविला. 

त्यापूर्वी चौथ्या दिवशी कर्णधार विराट कोहलीचे अर्धशतक आणि अखेरच्या जोडीने केलेल्या 42 धावांच्या भागीदारीमुळे भारताने दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात चारशेहून अधिक धावांचे आव्हान ठेवण्यात यश मिळविले. सकाळी त्यांच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना जखडून ठेवले आणि त्यानंतर दिवसअखेर कर्णधार ऍलिस्टर कूक आणि हसीब हमीद यांनी चिवट फलंदाजी केली. भारताचा दुसरा डाव सकाळी इंग्लंडने 204 धावांवर झटपट गुंडाळला. त्यानंतर विजयासाठी 405 धावांचे आव्हान आणि त्याचा बचाव करण्यासाठी फिरकीस पोषक असणाऱ्या खेळपट्टीवर भारतासाठी विजय सहज असेच मानले जात होते.

Web Title: India win the 2nd Test by 246 runs, lead the 5-match Test series 1-0