Asia Cup 2018 : सामना एकीकडे अन् सगळ्यांच्या नजरा तिच्यावरच

वृत्तसंस्था
Thursday, 20 September 2018

आशिया कप स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर सहज विजय मिळवला. भारत पाकिस्तान सामना म्हटले की, प्रेक्षकांसाठी प्रत्येक चेंडू महत्वाचा असतो. मैदानातील प्रत्येक घडामोडीवर प्रेक्षकांचे लक्ष असते, परंतु या सामन्यात खेळाडूंच्या कामगिरीऐवजी एका वेगळ्याच व्यक्तीवर सगळ्यांच्या नजरा खिळल्या होत्या.

दुबई : आशिया कप स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर सहज विजय मिळवला. भारत पाकिस्तान सामना म्हटले की, प्रेक्षकांसाठी प्रत्येक चेंडू महत्वाचा असतो. मैदानातील प्रत्येक घडामोडीवर प्रेक्षकांचे लक्ष असते, परंतु या सामन्यात खेळाडूंच्या कामगिरीऐवजी एका वेगळ्याच व्यक्तीवर सगळ्यांच्या नजरा खिळल्या होत्या.
 

छायाचित्रकारही सातत्याने त्याच व्यक्तीचे छायाचित्र टिपण्यासाठी उत्सुक दिसले. ती एक पाकिस्तानी क्रिकेट चाहती होती. या सामन्यानंतर त्या पाकिस्तानी मुलीचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. या मुलीच्या सौंदर्याचे भारतातही खूप चाहते झाले आहेत. भारताने सामना जिंकला असला तरी या सामन्यात मात्र सगळ्यांच्या नजरा या त्या मुलीवरच खिळल्या होत्या. भारतीय प्रेक्षक तिच्या सौंदर्याची जोरदार चर्चा आता सोशल मिडीयावर करताना दिसत आहेत.
 

ट्विटरवर एका प्रेक्षकाने तर असे म्हटले आहे, की पाकिस्तान सातत्याने भारत आणि पाकिस्तान सामन्याला अशा मुलींना पाठवतो कारण की, भारतीय खेळाडूंचे लक्ष विचलीत व्हावे आणि त्याचा परिणाम त्यांच्या खेळावर व्हावा. अशा प्रकारे अनेक जणांनी वेगवेगळ्या आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India wins the match but fans lose to this cute Pakistani girl