esakal | भारतीय महिलांचा श्रीलंकेवर विजय 
sakal

बोलून बातमी शोधा

India women beat Sri Lanka to keep final hopes alive


आशिया करंडक स्पर्धेतील अंतिम सामन्याच्या आशा कायम 

भारतीय महिलांचा श्रीलंकेवर विजय 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

क्वालालंम्पूर (मलेशिया) - बांगलादेशाकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर प्रेरित झालेल्या भारतीय महिला संघाने गुरुवारी आशियाई करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेवर सात विकेट राखून विजय मिळविला. या विजयासह त्यांनी अंतिम फेरी प्रवेशाच्या आशा कायम ठेवल्या. भारतीय महिलांना अंतिम फेरी गाठण्यासाठी आता शनिवारी (ता. 9) पाकिस्तानवर विजय आवश्‍यक आहे. 

भारतीय महिलांनी या विजयाबरोबरच श्रीलंका संघावरील आपले अपराजित्व कायम राखले. भारताच्या विजयात फिरकी गोलंदाज एकता बिश्‍त (2-20) हिची कामगिरी मोलाची ठरली. झुलन गोस्वामी, अनुजा पाटील आणि पूनम यादव यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले. त्यानंतर आघाडीच्या फळीतील फलंदाजांच्या कामगिरीने 3 बाद 110 धावा करून त्यांनी सात चेंडू राखून विजय मिळविला. 

श्रीलंकेला प्रथम फलंदाजी करताना भारताने 7 बाद 107 असे रोखले होते. त्यानंतर मिताली राज आणि स्मृती मानधना यांनी भारताला चांगली सुरवात दिली. या दोघीपाठोपाठ बाद झाल्यावर कर्णधार हरमनप्रीत कौर हिने 15 चेंडूत 24 धावांची खेळी केली. हरमनप्रीत बाद झाल्यावर वेदा कृष्णमूर्ती आणि अनुजा पाटील यांनी नाबाद 40 धावांची भागीदारी करत भारताचा विजय साकार केला. 

त्यापूर्वी हसिनी परेरा (43 चेंडूंत 46 धावा) आणि यशोदा मेंडिस (39 चेंडूंत 27 धावा) यांच्या फटकेबाजीने श्रीलंकेला शतकी मजल मारणे शक्‍य झाले. 

संक्षिप्त धावफलक ः 
श्रीलंका 20 षटकांत 7 बाद 107 (हसिनी परेरा 46, एकता बिश्‍त 2-20) पराभूत वि. भारत 18.5 षटकांत 3 बाद 110 (वेदा कृष्णमूर्ती 29, ओशादी रणसिंगे 1-15)

loading image