मितालीच्या शानदार शतकाने भारत ‘अ’ संघाचा दुसरा विजय

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 October 2018

मुंबई - भारताची सर्वात अनुभवी फलंदाज मिताली राजच्या नाबाद शतकाच्या जोरावर भक्कम धावसंख्या उभारणाऱ्या भारत ‘अ’ संघाने सलग दुसऱ्या ट्‌वेंटी-२० सामन्यात ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाचा २८ धावांनी पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.

बीकेसी येथील शरद पवार अकादमीत सुरू असलेल्या या मालिकेत पहिल्या सामन्यात स्मृती मानधना आणि हरनप्रीत कौर यांनी शानदार अर्धशतके केली होती. आज स्मृती लवकर बाद झाल्यावर किल्ला लढवणाऱ्या मितालीने ३१ चेंडूत अर्धशतक आणि ५९ चेंडूत शतक केले. या खेळीत मितालीने १८ चौकार मारले. स्मृती (१), जेमिमा रॉड्रिग्ज (५) आणि अनुजा पाटील (०) अपयशी ठरल्या. हरनप्रीत कौरने ३३ चेंडूत ५७ धावांची खेळी केली. 

दीप्ती शर्मा, पूनम यादव आणि अनुजा पाटील यांनी प्रत्येकी दोन विकेट मिळवल्या.

संक्षिप्त धावफलक -
भारत अ - ५ बाद १८४ (मिताली राज नाबाद १०५, हरमनप्रीत कौर ५७, ताहिला मॅग्रा २-३६) वि. वि. ऑस्ट्रेलिया अ ९ बाद १५६/९ (ताहिला मॅग्रा ४७, हेराथ ग्रॅहम २४, पूनम यादव २-२९. दीप्ती शर्मा २-३२, अनुजा पाटील २-३१).

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India Women Cricket team Win