हुर्रेऽऽ! मालिका जिंकली; मोसमही जिंकला!

सुनंदन लेले
मंगळवार, 28 मार्च 2017

'क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे आणि इथे वैयक्तिक नव्हे, तर एकत्रित कामगिरीला जास्त महत्त्व असते,' हे वाक्‍य आपण खूप वेळा ऐकले आहे. इतक्‍या सामन्यांचे मी वार्तांकन केले; पण फार कमी वेळा खऱ्या अर्थाने सांघिक कामगिरीचा नमुना मैदानावर पाहायला मिळाला.

प्रचंड थकविणाऱ्या 13 कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मोसमाची भारताने आज (मंगळवार) यशस्वी सांगता केली. 'क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे आणि इथे वैयक्तिक नव्हे, तर एकत्रित कामगिरीला जास्त महत्त्व असते,' हे वाक्‍य आपण खूप वेळा ऐकले आहे. इतक्‍या सामन्यांचे मी वार्तांकन केले; पण फार कमी वेळा खऱ्या अर्थाने सांघिक कामगिरीचा नमुना मैदानावर पाहायला मिळाला. सध्याच्या भारतीय संघाने कसोटी मानांकनात अव्वल क्रमांक पटकाविला आहे किंवा न्यूझीलंड-इंग्लंड-बांगलादेश-ऑस्ट्रेलियाला पराभूत करून अभूतपूर्व यश मिळविले, म्हणून मला कौतुकाचे पाट काढायचे नाहीत; तर 'एकमेका साह्य करू, अवघे जिंकू सामने' अशा प्रकारे प्रवास केला, म्हणून कौतुक करायचे आहे. 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एका मोसमात 13 कसोटींचे आयोजन करून खरं तर खेळाडूंवर अन्याय केला होता. 13 सामने म्हणजे 13 शहरांत खेळणे भाग होते. म्हणजे 13 शहरांतील हवामानापासून ते विविध प्रकारच्या खेळपट्ट्यांशी जुळवून घेण्याचे आव्हान होते. भारतीय संघाने ते ताकदीने पेलले. याला मुख्य कारणे होती तीन.. 

 1. संघातील फलंदाजांनी चांगला जम बसल्यानंतर मोठी खेळी केली. त्यामुळे बहुतांश वेळा संघाची धावसंख्याही मोठी झाली. 
 2. संघाला गरज असताना तळातील फलंदाजांनी अपेक्षित कामगिरी केली. संघ अडचणीत आला, तेव्हा तळातील फलंदाजांनी जिद्दीने विकेटवर टिकून राहण्याचे आव्हान स्वीकारले. 
 3. फिरकी गोलंदाजांबरोबरच वेगवान गोलंदाजांमध्येही झालेली सुधारणा. आश्‍विन आणि रवींद्र जडेजाची कामगिरी जितकी चांगली झाली, तितकीच चांगली कामगिरी उमेश यादवने केली. भारतीय संघाने जिंकलेल्या प्रत्येक सामन्यात उमेशने भेदक आणि वेगवान मारा केला. 

यश मिळाले म्हणून फक्त खेळाडूंचे गुणगान करणे अन्यायाचे ठरेल. भारतीय संघाच्या यशाला प्रशिक्षकांनी केलेली प्रचंड मेहनतही कारणीभूत होती, हे विसरून चालणार नाही. अनिल कुंबळे यांचे नियोजन झकास होते. पुण्यातील सामना गमावल्यानंतर भारतीय संघ निराशेकडे झुकणार नाही, याची काळजी घेताना कुंबळे यांनी संघाला क्रिकेटपासून दूर नेले. सह्याद्रीच्या कुशीत संघाला नेऊन संघबांधणीचा अनोखा उपक्रम कुंबळे यांनी केला आणि त्याचा फार चांगला परिणाम झाला. खांदा ट्रकमध्ये टाकून परत आणावा लागेल, इतके प्रचंड थ्रो-डाऊन करत फलंदाजीचे प्रशिक्षक संजय बांगर यांनी प्रत्येक फलंदाजाला सराव दिला. खेळाडूंना दुखापत होऊ नये म्हणून फिजिओ पॅट्रिक फरहात झटले. तसेच, थकावटीतून बाहेर येण्यासाठी हात दुखेपर्यंत अरुण कानडे यांनी खेळाडूंना मसाज केला. या सगळ्यांचे योगदान पडद्यामागे होते, हे लक्षात ठेवायला हवे. 

इतके प्रचंड क्रिकेट खेळळ्यानंतर दुखापती होणे स्वाभाविक होते. महंमद शमी, वृद्धिमान साहा, अजिंक्‍य रहाणे, के. एल. राहुल, मुरली विजय, विराट कोहली या सर्वांना कधी ना कधी दुखापतीने खिंडीत गाठले. मोसम संपत असताना यांच्या दुखापती चांगल्याच बळावल्या होत्या. 'कॅलेंडरमध्ये मोकळी जागा दिसली, की कसोटी आयोजित करायची' ही वृत्ती 'बीसीसीआय'ने टाळली पाहिजे. नाहीतर उसाचा रस काढून त्याचे चिपाड होते, ती अवस्था खेळाडूंची होईल. मोलाच्या खेळाडूंच्या दुखापतींनी गंभीर स्वरूप धारण केले, तर बघता बघता चांगल्या संघाचे वाटोळे होऊ शकते. 

मोसमातील 113 कसोटींपैकी भारताने 10 सामने जिंकले, दोन अनिर्णित राहिले आणि एकच पराभव स्वीकारला, ही आकडेवारी बरेच काही सांगून जाते. गुढी पाडव्याला मालिकेतील विजयाची गुढी भारतीय संघाने धरमशालामध्ये उभारली आणि नवीन वर्षाची झकास सुरवात केली. देखण्या गुढीप्रमाणेच भारतीय संघही बांधला गेला आहे, ही भावनाच सुखावणारी आहे. 
 

अशी झाली भारतीय संघाची या मोसमातील कामगिरी

न्यूझीलंडचा भारत दौरा

 • पहिली कसोटी, कानपूर 

भारत : 318 आणि 5 बाद 377 घोषित 
न्यूझीलंड : 262 आणि 236 
निकाल : भारताचा 197 धावांनी विजय 

 • दुसरी कसोटी, कोलकाता 

भारत : 316 आणि 263 
न्यूझीलंड : 204 आणि 197 
निकाल : भारताचा 178 धावांनी विजय 

 • तिसरी कसोटी, इंदूर 

भारत : 5 बाद 557 घोषित आणि 3 बाद 216 घोषित 
न्यूझीलंड : 299 आणि 153 
निकाल : भारताचा 321 धावांनी विजय 
 

न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय मालिका (ऑक्‍टोबर 2016) 

 • पहिली वनडे, धरमशाला 

न्यूझीलंड : सर्वबाद 190 
भारत : 4 बाद 194 
निकाल : भारताचा 101 चेंडू आणि सहा गडी राखून विजय 
 

 • दुसरी वनडे, दिल्ली 

न्यूझीलंड : 9 बाद 242 
भारत : सर्वबाद 236 
निकाल : न्यूझीलंडचा सहा धावांनी विजय 

 • तिसरी वनडे, मोहाली 

न्यूझीलंड : सर्वबाद 285 
भारत : 3 बाद 289 
निकाल : भारताचा दहा चेंडू आणि सात गडी राखून विजय 

 • चौथी वनडे, रांची 

न्यूझीलंड : 7 बाद 260 
भारत : सर्वबाद 241 
निकाल : न्यूझीलंडचा 19 धावांनी विजय 

 • पाचवी वनडे, विशाखापट्टणम 

भारत : 6 बाद 269 
न्यूझीलंड : सर्वबाद 79 
निकाल : भारताचा 190 धावांनी विजय 

इंग्लंडचा भारत दौरा 

 • पहिली कसोटी, राजकोट 

इंग्लंड : 537 आणि 3 बाद 260 घोषित 
भारत : 488 आणि 2 बाद 172 
निकाल : अनिर्णित 
 

 • दुसरी कसोटी, विशाखापट्टणम 

भारत : 455 आणि 204 
इंग्लंड : 255 आणि 158 
निकाल : भारताचा 246 धावांनी विजय 

 • तिसरी कसोटी, मोहाली 

इंग्लंड : 283 आणि 236 
भारत : 417 आणि 2 बाद 104 
निकाल : भारताचा आठ गडी राखून विजय 

 • चौथी कसोटी, मुंबई 

इंग्लंड : 400 आणि 195 
भारत : 631 
निकाल : भारताचा एक डाव आणि 36 धावांनी विजय 
 

 • पाचवी कसोटी, चेन्नई 

इंग्लंड : 477 आणि 207 
भारत : 7 बाद 759 घोषित 
निकाल : भारताचा एक डाव आणि 75 धावांनी विजय 
 

इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका (जानेवारी 2017) 

 • पहिली वनडे, पुणे

इंग्लंड : 7 बाद 350 
भारत : 7 बाद 356 
निकाल : भारताचा 11 चेंडू अणि तीन गडी राखून विजय 

 • दुसरी वनडे, कटक 

भारत : 6 बाद 381 
इंग्लंड : 8 बाद 366 
निकाल : भारताचा 15 धावांनी विजय 

 

 • तिसरी वनडे, कोलकाता
  इंग्लंड : 8 बाद 321
  भारत : 9 बाद 316 

निकाल : इंग्लंडचा पाच धावांनी विजय 

 • पहिली ट्‌वेंटी-20, कानपूर 

भारत : 7 बाद 147 
इंग्लंड : 3 बाद 148 
निकाल : इंग्लंडचा 11 चेंडू आणि सात गडी राखून विजय 
 

 • दुसरी ट्‌वेंटी-20, नागपूर 

भारत : 8 बाद 144 
इंग्लंड : 3 बाद 139 
निकाल : भारताचा पाच धावांनी विजय 

 • तिसरी ट्‌वेंटी-20, बंगळूर 

भारत : 6 बाद 202 
इंग्लंड : 127 
निकाल : भारताचा 75 धावांनी विजय 
 

बांगलादेशचा भारत दौरा 

 • एकमेव कसोटी, हैदराबाद

भारत : 6 बाद 687 घोषित आणि 4 बाद 159 घोषित 
बांगलादेश : 388 आणि 250 
निकाल : भारताचा 208 धावांनी विजय 
 

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा 

 • पहिली कसोटी, पुणे 

ऑस्ट्रेलिया : 260 आणि 285 
भारत : 105 आणि 107 
निकाल : ऑस्ट्रेलियाचा 333 धावांनी विजय 
 

 • दुसरी कसोटी, बंगळूर 

भारत : 189 आणि 274 
ऑस्ट्रेलिया : 276 आणि 112 
निकाल : भारताचा 75 धावांनी विजय 

 • तिसरी कसोटी, रांची 

ऑस्ट्रेलिया : 451 आणि 6 बाद 204 
भारत : 9 बाद 603 घोषित 
निकाल : अनिर्णित 

 • चौथी कसोटी, धरमशाला 

ऑस्ट्रेलिया : 300 आणि 137 
भारत : 332 आणि 2 बाद 106 
निकाल : भारताचा आठ गडी राखून विजय

Web Title: Indian Cricket Team finished the season on high, writes Sunandan Lele