भारतीय खेळाडूंच्या 'जर्सी'वर हे कुणाचे नाव? 

वृत्तसंस्था
शनिवार, 29 ऑक्टोबर 2016

विशाखापट्टणम : न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील निर्णायक पाचव्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आज (शनिवार) नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. जयंत यादव या फिरकी गोलंदाजाला भारताने पदार्पणाची संधी दिली आहे. पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये भारत आणि न्यूझीलंडमध्ये 2-2 अशी बरोबरी आहे. 

दरम्यान, 'स्टार स्पोर्टस'च्या उपक्रमाचा एक भाग म्हणून भारतीय संघातील खेळाडूंच्या जर्सीवर त्यांच्या नावाऐवजी त्यांच्या आईचे नाव झळकले आहे. गेल्या काही दिवसांपासून याविषयीच्या जाहिराती टीव्हीवर झळकत होत्या. यासंदर्भात अजिंक्‍य रहाणे म्हणाला, "माझ्या खेळासाठी माझ्या आईने खूप कष्ट घेतले आहेत. मला अजूनही त्या सगळ्या गोष्टी आठवतात. हा उपक्रम चांगला आहे.'' 

या सामन्यासाठी भारतीय संघात दोन बदल झाले आहेत. हार्दिक पंड्याऐवजी जयंत यादवला संधी मिळाली, तर दुखापतीमुळे चौथ्या सामन्यास मुकलेला वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह तंदुरुस्त झाल्यामुळे धवल कुलकर्णीला संघाबाहेर बसावे लागले. यादवच्या समावेशामुळे भारतीय संघ या सामन्यात तीन फिरकी आणि दोन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरला आहे. 

न्यूझीलंडच्या संघातही एक बदल झाला आहे. अँटॉन डेव्हचिकच्या जागी कोरे अँडरसनला संघात स्थान मिळाले. 

भारतीय संघ: 
रोहित शर्मा, अजिंक्‍य रहाणे, विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी (यष्टिरक्षक, कर्णधार), मनीष पांडे, केदार जाधव, अक्षर पटेल, जयंत यादव, अमित मिश्रा, उमेश यादव, जसप्रित बुमराह 

न्यूझीलंडचा संघ: 
मार्टिन गुप्टील, टॉम लॅथम, केन विल्यम्सन (कर्णधार), रॉस टेलर, कोरे अँडरसन, जेम्स निशॅम, बी. जे. वॉटलिंग (यष्टिरक्षक), मिचेल सॅंटनर, टिम साऊदी, ईश सोधी, ट्रेंट बोल्ट. 

Web Title: Indian players to wear jerseys with their mother's name in final ODI against New Zealand