दुसऱ्या ट्वेंटी सामन्यात संघात बदल होण्याची शक्यता

वृत्तसंस्था
Friday, 29 June 2018

2019 मध्ये होणाऱ्या विश्वकरंडकाची पूर्वतयारी असे मानल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित इंग्लंड दौऱ्यासाठी प्रत्येक खेळाडूला येथील खेळपट्ट्यांचा सराव व्हावा यासाठी आज होणाऱ्या दुसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात भारतीय संघात 'बेंच स्ट्रेंथ'ला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

डब्लिनः 2019 मध्ये होणाऱ्या विश्वकरंडकाची पूर्वतयारी असे मानल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित इंग्लंड दौऱ्यासाठी प्रत्येक खेळाडूला येथील खेळपट्ट्यांचा सराव व्हावा यासाठी आज होणाऱ्या दुसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात भारतीय संघात 'बेंच स्ट्रेंथ'ला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

भारत तीन महिन्यांच्या प्रदिर्घ काळासाठी ब्रिटनच्या दौऱ्यावर आहे. आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी20 सामन्यातील दमदार विजयामुळे भारतीय संघाची सकारात्मक सुरुवात झाली आहे. पहिल्या सामन्यात एकीकडे रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी धावांचा वर्षाव करत आपण फॉर्मात असल्याचे सांगितले तर दुसरीकडे गोलंदाजीमध्ये युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या जोडीने पुन्हा वर्चस्व गाजवले. या कामगिरीमुळे भारतीय संघाची कामगिरी उत्तम झाल्याचे दिसून आले मात्र आयपीएलमध्ये चांगला फॉर्म असलेले के.एल.राहुल, दिनेश कार्तिक आणि उमेश यादव या 'बेंच स्ट्रेंथ'ला संधी देण्याचा पेच निवड समितीसमोर आहे. 

पहिल्या सामन्यानंतर याविषयी बोलताना कर्णधार विराट कोहली म्हणाला, "आम्ही प्रत्येकाला खेळवू इच्छितो आणि त्यामुळे आम्ही मधल्या फळीत प्रयोग करणार आहोत. कारण बरेच खेळाडू परदेश दौऱ्यावर येऊनही त्यांना संधी मिळत नाही''. रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, धोनी आणि दोन्ही प्रमुख फिरकी गोलंदाज यांचे संघातील स्थान कायम राहील त्यामुळे संधी मिळाल्यास राहुल मधल्या फळीत खेळेल हे नक्की.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian team might change for last T20 match