भारतीय संघाचा 'विराट' मोर्चा- 3 बाद 76

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 सप्टेंबर 2016

कोलकता- प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला समाधानकारक सुरवात करता आली नाही. सकाळच्या सत्रामध्ये 35 षटकांमध्ये 3 बाद 76 अशी भारताची अवस्था झाली.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिेकेट संघाने किवींच्या विरुद्ध सलग दुसरा विजय मिळविल्यास कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडिया प्रथम क्रमांकावर पोचणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध भारताने नाणेफेक जिंकली असून, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय विराटने घेतला.

आजपासून (शुक्रवार) सुरू झालेला भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा कसोटी सामना कोलकताच्या ईडन गार्डन्सवर दुसरा कसोटी सामना रंगणार आहे. पहिला कसोटी सामना जिंकून भारताने 1-0 अशी आघाडी मिळविली आहे. पश्चिम बंगालमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा नवरात्र उत्सवही सुरू होत असल्याने प्रेक्षकांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. सामन्यापूर्वी बंगाल क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष व माजी कर्णधार सौरव गांगुलीने ईडनच्या खेळपट्टीची पाहणी केली. 

के एल राहुलच्या जागी शिखर धवन खेळणार आहे. तसेच, उमेश यादवच्या जागी भुवनेश्वर कुमारला संधी देण्यात आली आहे. 

Web Title: Indian team 'V' morca 3 after 76