भारताचा सलग 17 वा विराट कसोटी विजय

वृत्तसंस्था
सोमवार, 12 डिसेंबर 2016

मुंबईः एक डाव आणि 36 धावांनी चौथी कसोटी खिशात घालतानाच भारतीय कर्णधार विराट कोहलीने स्वतःच्या खात्यात आणखी नव्या विक्रमांची भर आज (सोमवार) घातली. 

तब्बल आठ वर्षांनंतर इंग्लंडविरुद्ध मालिका जिंकण्याचा पराक्रम कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाने करून दाखविला आहे. 

सलग पाच मालिकांमध्ये विजय मिळवून कोहलीने महेंद्र सिंग धोनी, वीरेंद्र सेहवाग, अनिल कुंबळे यांच्या पंक्तीत स्थान मिळविले. धोनी, सेहवाग आणि कुंबळेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सलग पाच मालिकांमध्ये विजय मिळविला होता. 

ऑस्ट्रेलिया दौऱयात 2014 मध्ये कोहलीकडे कर्णधारपदाची धुरा आली. त्यानंतर त्याने दक्षिण आफ्रिका (भारतात), श्रीलंका (श्रीलंकेत), वेस्ट इंडिज (वेस्ट इंडिजमध्ये) आणि न्यूझिलंड (भारतात) संघांना पाणी पाजले होते. आता इंग्लंडविरुद्ध भारतात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत कोहलीच्या संघाने 3-0 अशी आघाडी घेतली आहे. 

इंग्लंडविरुद्धच्या विजयानंतर कोहलीच्या संघाने सलग 17 कसोटी सामने जिंकले आहेत. 235 धावांची दणदणीत खेळी करणारा कोहली भारताचा एका डावात सर्वाधिक धावा करणारा कर्णधारही ठरला आहे. 

सोमवारी इंग्लंडचा डाव अवघ्या 195 धावात गुंडाळून भारताने 17 वा कसोटी विजय नोंदवला. या विजयात रवीचंद्रन अश्विनची कामगिरी मोलाची राहिली. त्याने दोन्ही डावात प्रत्येकी सहा विकेट घेतल्या. एका डावात पाच किंवा अधिक विकेट घेण्याची अश्विनची ही 24 वी वेळ. अश्विनने आतापर्यंत 43 कसोटीत 247 विकेट घेतल्या आहेत.

Web Title: India's 17th consecutive Test victory, Virat

फोटो गॅलरी