कसोटी अजिंक्‍यपद भारताची सलामी विंडीजविरुद्ध 

वृत्तसंस्था
Thursday, 21 June 2018

अशी होईल कसोटी स्पर्धा 
- दोन वर्षांच्या कालावधीत प्रत्येक संघ होम आणि अवे अशा सहा मालिका खेळणार. 
- मालिकांदरम्यान कोणते सामने कसोटी अजिंक्‍यपदाचे असणार हे परस्परांनी ठरवायचे. 
- पहिल्या दोन संघांत अंतिम सामना जून 2021 मध्ये होणार. 

नवी दिल्ली - बहुचर्चित कसोटी क्रिकेट अजिंक्‍यपद स्पर्धेत भारताची मोहीम वेस्ट इंडीजविरुद्ध कॅरेबियन बेटावरून सुरू होणार आहे. पुढील वर्षी जुलैमध्ये भारताची ही सलामी होईल. सध्या कसोटी क्रिकेटमध्ये भारत अव्वल स्थानी आहे. विंडीजबरोबरच्या या सलामीनंतर 2020 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 13 संघांची भारताच्या मोहिमेची एकदिवसीय लीग सुरू होईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) 2018 ते 2023 या पाच वर्षांचा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम जाहीर केला. यामध्ये 15 जुलै 2019 ते 30 एप्रिल 2021 या कालावधीतील कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेच्या कार्यक्रमाचा समावेश आहे. कसोटी क्रमवारीत सध्या पहिल्या नऊ क्रमांकांमध्ये असलेल्या संघामध्ये ही स्पर्धा होणार आहे. 

अशी होईल कसोटी स्पर्धा 
- दोन वर्षांच्या कालावधीत प्रत्येक संघ होम आणि अवे अशा सहा मालिका खेळणार. 
- मालिकांदरम्यान कोणते सामने कसोटी अजिंक्‍यपदाचे असणार हे परस्परांनी ठरवायचे. 
- पहिल्या दोन संघांत अंतिम सामना जून 2021 मध्ये होणार. 

जागतिक एकदिवसीय लीग 
- कसोटीतील 12 संघ आणि नेदरलॅंड्‌स अशा 13 संघांत जागतिक एकदिवसीय लीग. 
- 1 मे 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत प्रत्येक संघ होम आणि अवे धर्तीवर आठ मालिका खेळणार. 
- ही एकदिवसीय लीग 2023 च्या विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी पात्रता स्पर्धा होणार. 
- 13 पैकी पहिले सात संघ थेट पात्र होणार. 
- 2023 ची विश्‍वकरंडक स्पर्धा भारतात होणार. 

कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेतून पुढील पाच वर्षांत द्विपक्षीय मालिकांमधील चुरस वाढेल आणि प्रत्येकासाठी आव्हानही असेल. तसेच याद्वारे प्रेक्षकांना वर्षभर क्रिकेटचा आनंद घेता येईल. 
- डेव्ह रिचर्डसन, आयसीसी "सीईओ' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India's first Test against the West Indies