भारताच्या झूलन गोस्वामीचा विश्वविक्रम

वृत्तसंस्था
मंगळवार, 9 मे 2017

झूलन 34 वर्षांची आहे. 'महिला क्रिकेटची कपिल देव' अशी तिची ओळख आहे. दक्षिण आफ्रिकेतील चौरंगी क्रिकेट स्पर्धेत तिने हा टप्पा गाठला.

पॉटचेफस्ट्रुम (दक्षिण आफ्रिका) : भारताची वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामी हिने महिला वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेटचा उच्चांक प्रस्थापित केला. तिने ऑस्ट्रेलियाची वेगवान गोलंदाज कॅथरीन फिट्झपॅट्रीक हिचा 180 विकेटचा विश्वविक्रम मोडला.

झूलन 34 वर्षांची आहे. 'महिला क्रिकेटची कपिल देव' अशी तिची ओळख आहे. दक्षिण आफ्रिकेतील चौरंगी क्रिकेट स्पर्धेत तिने हा टप्पा गाठला.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिने 20 धावांत तीन विकेट घेतल्या. 153 सामन्यांत तिच्या 181 विकेट झाल्या. कॅथरीनने 109 सामन्यांत 180 विकेट घेतल्या होत्या. कॅथरीनने 2007 मध्ये निवृत्ती घेतली.

झूलन उजव्या हाताने वेगवान मारा करते. तिने 10 कसोटींमध्ये 40 विकेट घेतल्या आहेत, तर 60 टी-20 सामन्यांमध्ये 50 विकेट मिळविल्या आहेत. वन-डे क्रिकेटमध्ये तिचा इकॉनॉमी रेट 3.81 आहे.

या सामन्यात तिने नदीन डी क्लर्क (7), मसाबाता क्लास (4) आणि रैसिबी एन्टोझाखे (0) या तिघींना बाद केले.

Web Title: India's Jhoolan Goswami creates history in World Cricket