अशी केली टीम इंडियाने वसुली !

टीम ईसकाळ
मंगळवार, 7 मार्च 2017

बंगळूरमध्ये रवींद्र जडेजाने पहिल्या डावात सहा गडी बाद करत भारताला आशा दाखविली. दुसऱ्या डावात चेतेश्‍वर पुजारा, अजिंक्‍य रहाणे, वृद्धिमान साहा आणि ईशांत शर्मा यांनी चिवट फलंदाजी करत ऑस्ट्रेलियासमोर आव्हान निर्माण केले. डेव्हिड वॉर्नर ज्या धडाक्‍याने सुरवात करतो आणि काहीशा विचित्र शैलीत फलंदाजी करणारा स्टीव्ह स्मिथ धावांची टांकसाळ जशी उघडतो, त्यासमोर भारताचे आव्हान फारसे अवघड वाटत नव्हते. अडथळे दोनच होते.. आश्‍विन आणि जडेजा..! 

बंगळूर - फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्ट्या असतानाही भारताचा सर्वोत्तम फिरकी गोलंदाज रविचंद्रन आश्‍विनवर दडपण होतं. फारसं नाव नसलेले दोन प्रतिस्पर्धी फिरकी गोलंदाज समोरून भारतीय फलंदाजांना त्यांच्या तालावर नाचवत होते. पुण्यात स्टीव्ह ओकीफने आणि बंगळूरमध्ये नॅथन लिऑनने भारतीयांना बॅकफूटवर ढकलले होते; पण प्रचंड अपेक्षा असलेल्या आश्‍विनला मात्र कमाल करता येत नव्हती. 

बंगळूरमध्ये रवींद्र जडेजाने पहिल्या डावात सहा गडी बाद करत भारताला आशा दाखविली. दुसऱ्या डावात चेतेश्‍वर पुजारा, अजिंक्‍य रहाणे, वृद्धिमान साहा आणि ईशांत शर्मा यांनी चिवट फलंदाजी करत ऑस्ट्रेलियासमोर आव्हान निर्माण केले. डेव्हिड वॉर्नर ज्या धडाक्‍याने सुरवात करतो आणि काहीशा विचित्र शैलीत फलंदाजी करणारा स्टीव्ह स्मिथ धावांची टांकसाळ जशी उघडतो, त्यासमोर भारताचे आव्हान फारसे अवघड वाटत नव्हते. अडथळे दोनच होते.. आश्‍विन आणि जडेजा..! 

आश्‍विनला सुरवातीला दिशा-टप्पा सापडायला थोडा वेळ लागतो, असं म्हणतात.. विकेट मिळेनाशा झाल्या, की तो भरपूर वैविध्य आणायचाही प्रयत्न करतो.. पुण्यात तेच झालं. ज्या खेळपट्टीवर ओकीफ आणि लिऑन भेदक वाटत होते, तिथे आश्‍विनला सात विकेट्‌स मिळूनही त्याचा भारताला फायदा झाला नाही. बंगळूरमध्ये पहिल्या डावात आश्‍विनला दोनच गडी बाद करता आले. त्याच्या निम्मी षटके गोलंदाजी मिळालेल्या जडेजाने सहा विकेट्‌स काढल्या होत्या. त्यामुळे दुसऱ्या डावात आव्हान खडतर असताना कर्णधार विराट कोहली जडेजालाच जास्त षटके गोलंदाजी देईल, असं अनेकांना वाटत होतं. पण कोहलीनं दुसऱ्याच षटकापासून आश्‍विनला गोलंदाजी दिली. चौथ्या दिवसाची खेळपट्टी आणि गोलंदाजांच्या फूटमार्क्‍सचा अचूक फायदा घेत आश्‍विननं फलंदाजांना सातत्याने चकविले. ईशांत, उमेश यादव यांनी एका बाजूने ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर दडपण आणलं. 

भारताचा विजय दृष्टीक्षेपात

 • विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताचा 16 वा विजय
 • विराटच्या नेतृत्वाखाली भारताची कामगिरी 25 कसोटीत 16 विजय, 3 पराभव आणि 6 अनिर्णित
 • कसोटी कारकिर्दीत आश्विनची 25 वेळा पाचपेक्षा अधिक बळी मिळविण्याची कामगिरी
 • आश्विनने 47 कसोटीत ही कामगिरी करत रिचर्ड हेडलींना मागे टाकले. हेडलींनी 62 कसोटीत 25 वेळा पाचपेक्षा अधिक बळी मिळविले होते
 • या कामगिरीसाठी अनिल कुंबळेला 86 आणि हरभजनसिंगला 93 सामने खेळावे लागले होते
 • अश्विनने बिशनसिंग बेदी यांना मागे टाकत 47 कसोटीत 269 बळी मिळविले
 • बिशनसिंग बेदी यांनी 266 बळी मिळविले होते
 • भारताकडून कसोटीत सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत आश्विन पाचव्या स्थानी
 • 2016-17 या वर्षात आश्विनने सर्वाधिक 76 बळी मिळविले
 • मायदेशात कसोटी खेळताना आश्विनचे दोनशे बळी पूर्ण, 30 कसोटीतच केली कामगिरी
 • मायदेशात 200 बळींचा आकडा पूर्ण करणारा आश्विन चौथा गोलंदाज
 • भारताने सलग तिसऱ्यांदा 188 पेक्षा कमी धावांचे आव्हान ठेवल्यानंतरही विजय मिळविला
 • यापूर्वी 2004-05 मध्ये ऑस्ट्रेलियासमोर 107 आणि 1980-81 मध्ये 143 धावांचे आव्हान ठेवले होते.
 • पुण्यातील कसोटीत भारताने 11 धावांत 7 बळी गमाविले होते, ऑस्ट्रेलियाने 11 धावांत 6 बळी गमाविले
 • भारताने दुसऱ्या डावात 9 चेंडूत चार बळी गमाविले
 • चेतेश्वर पुजारा प्रथमच 90 पेक्षा अधिक धावा केल्यानंतर बाद झाला. 
 • यापूर्वी त्याने 10 वेळा 90 पेक्षा अधिक धावा केल्यानंतर शतक पूर्ण केले आहे.
Web Title: India's performance in second test cricket match against Australia