भारताचे सराव सामने न्यूझीलंड, बांगलादेशाशी

पीटीआय
शनिवार, 22 एप्रिल 2017

दुबई - आयसीसी अजिंक्‍यपद क्रिकेट स्पर्धेपूर्वी भारत न्यूझीलंड आणि बांगलादेशाविरुद्ध सराव सामने खेळणार आहे. आयसीसी अजिंक्‍यपद स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी या सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. भारताचे दोन्ही सामने ओव्हलमध्ये होतील. यातील न्यूझीलंडविरुद्धचा सामना २८ मे; तर बांगलादेशविरुद्धचा सामना ३० मे रोजी होणार आहे.  या स्पर्धेपूर्वी एकूण सहा सराव सामने २६ ते ३० मेदरम्यान खेळविण्यात येणार आहेत. हे सर्व सामने दुपारी ३ वाजता सुरू होतील. मुख्य स्पर्धेस १ जूनपासून सुरवात होईल. अंतिम सामना १८ जूनला खेळविण्यात येणार आहे.

दुबई - आयसीसी अजिंक्‍यपद क्रिकेट स्पर्धेपूर्वी भारत न्यूझीलंड आणि बांगलादेशाविरुद्ध सराव सामने खेळणार आहे. आयसीसी अजिंक्‍यपद स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी या सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. भारताचे दोन्ही सामने ओव्हलमध्ये होतील. यातील न्यूझीलंडविरुद्धचा सामना २८ मे; तर बांगलादेशविरुद्धचा सामना ३० मे रोजी होणार आहे.  या स्पर्धेपूर्वी एकूण सहा सराव सामने २६ ते ३० मेदरम्यान खेळविण्यात येणार आहेत. हे सर्व सामने दुपारी ३ वाजता सुरू होतील. मुख्य स्पर्धेस १ जूनपासून सुरवात होईल. अंतिम सामना १८ जूनला खेळविण्यात येणार आहे.  भारताला एकदिवसीय मानांकनात चौथे स्थान असून, त्यांचा ‘ब’ गटात समावेश करण्यात आला आहे. गटात पाकिस्तानसह श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका संघांचा समावेश आहे. 

Web Title: India's practice match will be against New Zealand, Bangladesh