भारताची 'विराट' धावसंख्या; बांगलादेश 1 बाद 41

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

हैदराबादः बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यावर भारताने पकड मिळविली असून कर्णधार विराट कोहलीचे द्विशतक, मुरली विजय आणि वृद्धिमान सहाच्या शतकी खेळीच्या आधारावर भारताने 6 बाद 687 धावांवर पहिला डाव घोषित केला. भारताच्या 687 एवढ्या बलाढ्य धावसंख्येचे आव्हान घेऊन दुसऱ्या दिवशी शेवटच्या सत्रात फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या बांगलादेशला अवघी 14 षटके खेळायला मिळाली. काहीशा चाचपडणाऱ्या बांगलादेशने दिवसअखेर 1 बाद 41 अशी धावसंख्या केली. 

भारतीय गोलंदाज उमेश यादवने सौम्या सरकारच्या रुपाने पहिला बळी टिपत बांगलादेशला सुरवातीलाच झटका दिला.
तमीम इक्बाल याने सुरवातीपासून सावध फलंदाजी करीत खेळपट्टीवर जम बसविण्याचा प्रयत्न केला. त्याने वैयक्तिक 50 ची सरासरी (स्ट्राईक रेट) राखत 48 चेंडूंत 24 धावा केल्या. मात्र, बाराव्या षटकात 38 धावांवर बांगलादेशचा पहिला गडी बाद झाला. त्यानंतर आलेल्या मोमिनूल हेक 5 चेंडूंत 1 धाव करून खाते उघडले. शनिवारी तिसऱ्या दिवशी बांगलादेश भारताला प्रत्युत्तर देण्यात कितपत यशस्वी होते याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.

बांगलादेशविरूद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारताने चांगली सुरूवात केली होती. आज (शुक्रवार) दुसऱ्या दिवशी भारताने सामन्यावर मजबूत पकड निर्माण होईल, अशी स्थिती निर्माण केली आहे. विराट कोहलीने धावांचा पाऊस पाडत खणखणीत द्विशतक ठोकले. त्याने 24 चौकारांच्या सहाय्याने 246 चेंडूत 204 धावा करत विक्रम प्रस्थापित केला.

मुरली विजयने 12 चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने 160 चेंडूत 108 धावा केल्या. तर, वृद्धिमान सहाने दोन षटकार आणि सात चौकरांच्या सहाय्याने 155 चेंडूत नाबाद 106 धावा केल्या. चेतेश्‍वर पुजारा (177 चेंडूत 83 धावा) आणि अजिंक्‍य रहाणे (133 चेंडूत 82 धावा) करत डावाला आकार देण्यास मदत केली. रविंद्र जडेजानेही 2 षटकार आणि 4 चौकारांच्या सहाय्याने 78 चेंडूत 60 धावा केल्या. बांगलादेशच्या वतीने तईजूल इस्लामने तीन बळी घेतले. तर मेहेदी हसनने दोन आणि टस्किन अहमदने एक बळी घेतला. सहा बाद 687 धावांवर भारताने आपला डाव घोषित केला.

आधी न्यूझीलंड आणि नंतर इंग्लंडविरूद्ध कमालीचे वर्चस्व गाजवणाऱ्या विराट सेनेने आता बांगलादेश टायगर्सलाही पिंजऱ्यात टाकण्याची तयारी सुरू केली.

Web Title: IndvBan : Double ton by Virat Kohli; India is in; Bangladesh 1-41