esakal | केदार जाधव आयपीएलमधून बाहेर
sakal

बोलून बातमी शोधा

Kedar Jadhav

केदार जाधव आयपीएलमधून बाहेर

sakal_logo
By
वृत्तसंस्था

चेन्नई : महाराष्ट्रातील हुकमी फलंदाज आणि तीन दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नई संघाला विजय मिळवून देणारा केदार जाधव यंदाच्या आयपीएलमधून बाहेर गेला आहे.

आम्हाला हा मोठा धक्का असल्याचे मत चेन्नई संघाच्या फलंदाजीचे प्रशिक्षक माईक हसी यांनी व्यक्त केले. 

मुंबईविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करत असताना 13 व्या षटकात केदारच्या मांडीचा स्नायू दुखावला. त्यामुळे त्याला काही काळासाठी निवृत्त व्हावे लागले; परंतु संघाला गरज असल्यामुळे अखेरच्या षटकात तो मैदानात परतला आणि षटकार व चौकार मारून त्याने संघाला विजय मिळवून दिला होता. 

काही सामने तो खेळू शकणार नाही असे सुरवातीचे चित्र होते; परंतु त्याची दुखापत लवकर बरी होण्यासारखी नाही. परिणामी त्याला संपूर्ण स्पर्धेसच मुकावे लागणार आहे. चेन्नईने त्याला सात कोटी 80 लाख रुपये मोजले होते. त्याचा बदली खेळाडू म्हणून चेन्नईने अजून कोणाची निवड केलेली नाही.

loading image