दुखापतीमुळे मिचेल स्टार्क पुन्हा 'आयपीएल' बाहेर

वृत्तसंस्था
Friday, 30 March 2018

जोहान्सबर्ग : चेंडू कुरतडल्याप्रकरणी मानहानी सहन करावी लागत असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाला आज (शुक्रवार) आणखी एक धक्का बसला. वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातून माघार घ्यावी लागली. या दुखापतीमुळे स्टार्क 'इंडियन प्रीमिअर लीग'च्या (आयपीएल) यंदाच्या मोसमातही खेळू शकणार नाही. 

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनी याने नाणेफेकीच्या वेळी ही माहिती दिली. 'या संपूर्ण दौऱ्यात स्टार्कला दुखापतींचा सामना करावा लागला होता. डाव्या पायाला फ्रॅक्‍चर झाल्यामुळे शेवटच्या कसोटीत त्याला विश्रांती द्यावी लागली', असे पेनीने सांगितले. या सामन्यानंतर स्टार्कवर ऑस्ट्रेलियामध्ये उपचार होणार आहेत. 

'आयपीएल'मध्ये स्टार्कला कोलकाता नाईट रायडर्सने तब्बल 9.4 कोटी रुपयांना करारबद्ध केले होते. यंदाच्या 'आयपीएल'मधून बाहेर पडावा लागलेला स्टार्क हा ऑस्ट्रेलियाचा तिसरा महत्त्वाचा खेळाडू आहे. यापूर्वी स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरवर बंदी घालण्यात आली होती. 

'आयपीएल'मधून माघार घेण्याचे हे स्टार्कचे सलग तिसरे वर्ष आहे. गेल्या वर्षी त्याने स्वत:हून माघार घेतली होती; तर 2016 मध्येही त्याला दुखापतीमुळे खेळता आले नव्हते. यापूर्वी तो विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाकडून खेळत होता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Injured Mitchell Starc to miss IPL for third year in row