ड्वेन ब्राव्हो आयपीएलमधून आऊट

वृत्तसंस्था
रविवार, 23 एप्रिल 2017

बन्सल यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की चॅम्पियन खेळाडूला आम्ही मुकत आहोत. दुखापतीमुळे तो यंदाच्या मोसमात खेळू शकणार नाही. त्याने लवकरात लवकर तंदुरुस्त व्हावे अशी मी प्रार्थना करतो.

राजकोट - गुजरात लायन्स संघाची यंदाच्या आयपीएलमध्ये खराब कामगिरी होत असताना आता त्यांना आणखी एक धक्का बसला आहे. अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होला दुखापतीमुळे आयपीएलला मुकावे लागणार आहे.

गुजरात लायन्स संघाचे मालक केशव बन्सल यांनी ट्विट करत ब्राव्हो आयपीएलमधून बाहेर गेल्याचे सांगितले. तसेच कर्णधार सुरेश रैनानेही याला दुजोरा दिला आहे. गुजरातने आतापर्यंत आयपीएलमध्ये खेळलेल्या सहा सामन्यांमध्ये फक्त दोन सामन्यांत विजय मिळविला आहे. गुणतालिकेत गुजरातचा संघ शेवटच्या स्थानावर आहे.

बन्सल यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की चॅम्पियन खेळाडूला आम्ही मुकत आहोत. दुखापतीमुळे तो यंदाच्या मोसमात खेळू शकणार नाही. त्याने लवकरात लवकर तंदुरुस्त व्हावे अशी मी प्रार्थना करतो.

Web Title: IPL 2017: Massive Setback For Gujarat Lions As Dwayne Bravo Is Ruled Out Of 10th Edition