संदीप शर्मा, गुप्टिलचा दिल्लीला जोरदार दणका 

वृत्तसंस्था
रविवार, 30 एप्रिल 2017

संक्षिप्त धावफलक -
दिल्ली 17.1 षटकांत सर्वबाद 67 (कॉरे अँडरसन 18, करुण नायर 11, संदीप शर्मा 4-20, वरुण ऍरॉन 2-3, अक्षर पटेल 2-22) वि.वि. पंजाब 7.5 षटकांत बिनबाद 68 (मार्टिन गुप्टिल नाबाद 50, हशिम आमला नाबाद 16). 

मोहाली - संदीप शर्माची भेदक गोलंदाजी आणि त्यानंतर मार्टिन गुप्टिलच्या फटकेबाजीने आयपीएलमध्ये रविवारी किंग्ज इलेव्हन पंजाबने दिल्ली डेअरडेव्हिल्सवर दणकेबाज विजय मिळविला. 

प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीला अवघ्या 67 धावांत गुंडाळल्यावर पंजाबने 7.5 षटकांतच बिनबाद 68 धावा करून विजय मिळविला. 

आयपीएलमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाची ही निचांकी धावसंख्या ठरली. दिल्लीचीदेखील दहा वर्षांतील ही सर्वांत खराब कामगिरी ठरली. पंजाबच्या संदीप शर्माने कारकिर्दीमधील सर्वोत्तम कामगिरी करताना 20 धावांत 4 गडी बाद केले. शनिवारी झालेल्या पावसामुळे संथ झालेल्या खेळपट्टीवर प्रथम गोलंदाजी करण्याचा मॅक्‍सवेलचा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. वरुण ऍरॉननेही दोन गडी बाद केले. 

त्यानंतर पंजाबने विजयी लक्ष्य 7.5 षटकांतच एकही गडी न गमावता पार केले. गुप्टिलने 27 चेंडूंत 6 चौकार, 3 षटकारांसह 50 धावा केल्या. हशिम आमला 16 धावांवर नाबाद राहिला. 

संक्षिप्त धावफलक -
दिल्ली 17.1 षटकांत सर्वबाद 67 (कॉरे अँडरसन 18, करुण नायर 11, संदीप शर्मा 4-20, वरुण ऍरॉन 2-3, अक्षर पटेल 2-22) वि.वि. पंजाब 7.5 षटकांत बिनबाद 68 (मार्टिन गुप्टिल नाबाद 50, हशिम आमला नाबाद 16). 

Web Title: IPL 2017 : Sandeep Sharma , Martin Guptill Star as kxip Thrash Delhi Daredevils by 10 Wickets