चेन्नईने चेपॉकवर कोलकात्याला चकविले 

वृत्तसंस्था
बुधवार, 11 एप्रिल 2018

चेन्नई - चेन्नई सुपर किंग्जने येथील चेपॉक स्टेडियमवर 203 धावांचे आव्हान दिलेल्या कोलकात्याला एक चेंडू राखून चकविले. आयपीएलमध्ये घरच्या मैदानावरही चेन्नईने विजयी पुनरागमन केले. 

चेन्नई - चेन्नई सुपर किंग्जने येथील चेपॉक स्टेडियमवर 203 धावांचे आव्हान दिलेल्या कोलकात्याला एक चेंडू राखून चकविले. आयपीएलमध्ये घरच्या मैदानावरही चेन्नईने विजयी पुनरागमन केले. 

अखेरच्या षटकात चेन्नईला 17 धावांची गरज होती. हे षटक आर. विनयकुमारला देण्यात आले. त्याचा नो-बॉल ठरलेला पहिलाच उसळता चेंडू ब्राव्होने स्टेडियममध्ये भिरकावत षटकार वसूल केला. विनयकडून एक वाईड पडला. पाचव्या चेंडूवर षटकार खेचत जडेजाने विजय साकार केला. चेन्नईला वॉट्‌सन-रायडू यांनी 35 चेंडूंमध्ये 75 धावांची तुफानी सलामी दिली. करनच्या चेंडूवर वॉट्‌सन सापळ्यात अडकला आणि सीमारेषेवर झेल देऊन परतला. कुलदीपने रायडूला, तर नारायणने रैनाला बाद केले. धोनीने 25 धावांची भर घातली, पण बिलिंग्जची मधल्या टप्प्यात टोलेबाजी बहुमोल ठरली. 

चेन्नई सुपर किंग्ज - 19.5 षटकांत 5 बाद 205 (शेन वॉट्‌सन 42-19 चेंडू, 3 चौकार, 3 षटकार, अंबाती रायडू 39-26 चेंडू, 3 चौकार, 2 षटकार, रैना 14, धोनी 25-28 चेंडू, 1 चौकार, 1 षटकार, सॅम बिलिंग्ज 56-23 चेंडू, 2 चौकार, 5 षटकार, जडेजा नाबाद 11, ब्राव्हो नाबाद 11, विनयकुमार 1.5-0-35-0, टॉम करन 2-39, नारायण 4-0-17-1, कुलदीप 3-0-27-1) 

Web Title: IPL 2018 Chennai Super Kings Kolkata Knight Riders