मुंबईच्या विजयाचा श्रीगणेशा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 18 April 2018

मुंबई - दोन बाद शून्यवरून द्विशतकी धावांची फिनिक्‍स भरारी घेणाऱ्या मुंबई इंडियन्सने विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा ४६ धावांनी पराभव केला आणि यंदाच्या आयपीएलमध्ये तीन पराभवांनंतर विजयाचा श्रीगणेशा केला. रोहित शर्मा आणि एविन लुईस यांची तुफानी शतकी भागी मुंबईचे नशीब बदलणारी ठरली.

मुंबई संघाने प्रथम २१३ धावांचा डोंगर उभा केला आणि त्यानंतर बंगळूरला ८ बाद १६७ धावांवर रोखले. विराटने नाबाद ९२ धावांची खेळी केली.

सर्वांत वाईट सुरवात होऊनही लुईस आणि रोहित यांनी कच खाल्ली नाही. डाव सावरण्याची जबाबदारी त्यांनी प्रतिहल्ला करून निभावली. क्षेत्ररक्षण मर्यादेच्या षटकांत १८ च्या सरासरीने धावा केल्या. या दोघांनी ११ षटकांत १०८ धावांची भागीदारी केली. या भागीत रोहितचा वाटा नावापुरता होता; परंतु लुईस बाद झाल्यानंतर त्याने सूत्रे हाती घेतली आणि उमेश यादवचे चेंडू प्रेक्षकांमध्ये भिरकावून बंगळूरच्या गोलंदाजीचे खच्चीकरण केले. रोहितने थोडे अगोदर टॉप गिअर टाकला असता तर त्याला शतक करण्याची संधी मिळाली असती. 

सलग दुसऱ्या सामन्यात दोनशेच्या पलीकडे धावा दिल्याचा परिणाम बंगळूरच्या फलंदाजीवर झालेला दिसून आला. मॅक्‍लेनघनने चार चेंडूींत डि कॉक आणि एबी डिव्हिलर्स यांना बाद केले. तेथेच सामन्याचा निकाल स्पष्ट झाला होता. 

संक्षिप्त धावफलक
मुंबई -  २० षटकांत ६ बाद २१३ (एविन लुईस ६५ -४२ चेंडू, ६ चौकार, ५ षटकार, रोहित शर्मा ९४ - ५२ चेंडू, १० चौकार, ५ षटकार, उमेश यादव २-३६,  अँडरसन २-४७) वि. वि. बंगळूर २० षटकांत ८ बाद १६७ (विराट कोहली नाबाद ९२ -६२ चेंडू, ७ चौकार, ४ षटकार,   बुमरा २-२८,  कृणाल पंड्या ३-२८, मॅक्‍लेघन २-२४).

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IPL 2018 Mumbai Indians get first win against RCB